खा.संजय (बंडू) जाधव यांच्या उपस्थितीत पूर्णेत शिवसेनेची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

Spread the love

३० ऑगस्टच्या परभणीतील शेतकरी-युवा संवाद मेळाव्याच्या तयारीचा घेतला आढावा; शेतकरी, युवक-युवती व लाडक्या बहिणींना मोठ्या संख्येने सहभागी करण्याचे आवाहन

पूर्णा, ता. २६ (प्रतिनिधी) :

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या परभणी येथील शेतकरी, लाडक्या बहीणीं-युवा संवाद मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते तथा परभणीचे खासदार संजय (बंडू) जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (ता. २६) पूर्णा येथील झिरो टी पॉइंट परिसरातील शिवसेना जिल्हा संपर्क कार्यालयात शिवसेना व संलग्नित पक्ष संघटनांच्या आजी-माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व शिवसैनिकांची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली.

oplus_131328

     बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करताना खासदार संजय जाधव म्हणाले की, येत्या ३० ऑगस्ट रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे परभणीत येणार असून, त्यांच्या उपस्थितीत शेतकरी व युवा संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री शिंदे हे शेतकरी, युवक-युवती तसेच विविध घटकांतील नागरिकांशी थेट संवाद साधणार आहेत.तालुक्यातील शेतकरी,युवक-युवती तसेच लाडक्या बहिणींना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घडवून देण्यासाठी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन आतापासूनच नियोजनबद्ध पद्धतीने कामाला लागावे, असे आवाहन खासदार जाधव यांनी केले.

    बैठकीच्या प्रारंभी शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी ३० ऑगस्ट रोजी परभणी येथे होणाऱ्या शेतकरी-युवा संवाद मेळाव्याच्या तयारीचा सविस्तर आढावा सादर केला. तालुक्यातून मोठ्या संख्येने नागरिकांचा सहभाग नोंदविण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.या बैठकीस ह.भ.प. नारायण महाराज पांचाळ, ह.भ.प. सोपानकाका बोबडे, डॉ. हरिभाऊ पाटील यांच्यासह शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम, दशरथ भोसले, काशिनाथ काळबांडे, व्यंकटराव पौळ, मुंजाभाऊ कदम, संतोष एकलारे,दादाराव पंडित,रौफ कुरेशी,रितेश काळे, संजय जल्लारे, मुंजाभाऊ कुकर, एकनाथ लोखंडे, प्रकाश कराळे, गजानन सवराते, बंडू आप्पा बनसोडे, श्याम कदम,गजानन हिवरे, मनोज उबाळे, शिवा पाथरकर, प्रा. गोविंद कदम, सुनील कदम, प्रदिप चापके, बालाजी वैद्य, सुदामराव डोईफोडे,गोविंद सोलव, गजानन शिराळे,विकास वैजवाडे, सचिन जोगदड, अंकित कदम, विशाल किरडे, अमजद पठाण, रवि गायकवाड,रामजी भालेराव,अशोक वाघमारे आदींसह तालुक्यातील शिवसेना व संलग्नित पक्ष संघटनांचे आजी-माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.बैठकीत ३० ऑगस्टच्या शेतकरी-युवा संवाद मेळाव्यास पूर्णा तालुक्यातून मोठ्या प्रमाणात उपस्थिती राहावी, यासाठी नियोजन, जनसंपर्क व जबाबदाऱ्यांबाबत चर्चा करण्यात आली

You cannot copy content of this page