बोरीत पोलीस व्यापारी संकुलाचे लोकार्पण

Spread the love

बोरी/प्रतिनिधी
येथील पोलीस प्रशासनाच्या व्यापारी संकुलाचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या हस्ते मंगळवारी(दि. २५)सायंकाळी संपन्न झाले.

या उद्घाटन सोहळ्यास अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, जिंतूर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल विभुते, पोलीस उपअधीक्षक (गृह) बुद्धिराज सुकाळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे, पोलीस कल्याण शाखेचे बालाजी तोटेवाड, बोरी पोलिसांचे सहायक पोलिस निरिक्षक रामेश्वर धोंडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पोलीस अधीक्षक पंकज कुमावत व उपस्थित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पावधीत या संकुलाची उभारणी करण्यात आली असून संकुलामध्ये एकूण २५ व्यापारी गाळे उभारण्यात आले आहेत. याबद्दल सहायक पोलिस निरिक्षक रामेश्वर धोंडगे व गुत्तेदारांचा पोलीस अधीक्षकांनी सन्मान केला.प्रास्ताविक बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे यांनी केले. कार्यक्रमास बोरी व परिसरातील नागरिक, पोलीस पाटील,पोलीस कर्मचारी, होमगार्ड, गाळाधारक व्यापारी बांधव आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महादेव गायकवाड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एस. एन. थोरवे, एन.एस. घोरपडे, शेख वसीम, राजेश जटाळ, प्रताप राठोड, साळवणे, प्रकाश मोरे, संघसेन कांबळे, श्रीराम दंडवते, रामप्रसाद कोकाटे, एच.बी. ससाने, महिला पोलीस कर्मचारी फरहीन रंगरेज, रूपाली इंगळे यांच्यासह पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांनी परिश्रम घेतले.


You cannot copy content of this page