स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही २० गावांत पक्की स्मशानभूमी नाही!
पुर्णा तालुक्यातील चित्र; पालकमंत्री बोर्डीकरांना भाजप तालुका अध्यक्ष संजय मोहितेचे साकडे
पूर्णा, ता. २९ (प्रतिनिधी) :
तालुक्यातील तब्बल २० गावांमध्ये स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत पक्क्या स्मशानभूमी नसल्याने नागरिकांना अंत्यविधीच्या वेळी मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः ऊन,पाऊस प्रतिकूल हवामानात अंत्यविधी करणे अत्यंत त्रासदायक ठरत असल्याने या गावांमध्ये तातडीने पक्क्या स्मशानभूमी उभारण्यात याव्यात, अशी मागणी भाजपचे पूर्णा (ग्रा.) तालुकाध्यक्ष संजय मोहिते यांनी परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पूर्णा तालुक्यातील मौ. महागाव, मौ. आडगाव सुगाव, मो. आजदापूर, मौ. रामापूर, मौ. माहेर, मी. बरबडी, मौ. भाटेगाव, मौ. चांगेफळ, मो. एकरुखा, मौ. कानडखेड १ व २, मो. कंठेश्वर सातेगाव, मौ. ममदापूर, मौ. गणपूर, मो. निळा, मौ. पेनूर, मो. रूपला (पांढरी), मौ. सादरलापूर, मौ. सारंगी अंतर्गत मिठापूर, मौ. सातेफळ आणि मौ. सुरवाडी या गावांमध्ये जागेची कमतरता तसेच स्मशानभूमीची जागाच सुनामी पक्की स्मशानभूमी तसेच तिथे लागणाऱ्या आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना वर्षानुवर्षे समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अंत्यविधीच्या वेळी नागरिकांची मोठी कुचंबणा होते.अनेक गावकऱ्यांकडून पक्क्या स्मशानभूमी/ शेड बांधण्याची मागणी केली जात असतानाही अद्याप हा प्रश्न मार्गी लागलेला नसल्याचे पालकमंत्री महोदयांनी तालुक्यातील या २० गावांची समस्या सोडविण्यासाठी जातीने लक्ष घालून संबंधित विभागास सुचना देत निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी निवेदनातून केली आहे.









