सेवानिवृत्त विभागीय कृषी सहसंचालक रमेश भताने वर गुन्हा दाखल करण्याचे आदेश. वसंत मुंडे

Spread the love

सेवानिवृत्त विभागीय कृषी सहसंचालक रमेश भताने वर गुन्हा दाखल करण्याचे आदेश. वसंत मुंडे

परळी-वैद्यनाथ(वार्ता) महाराष्ट्रात बीड जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेची कृषी खात्याच्या दक्षता पथकाकडून दोन वेळेस चौकशी केली, त्यामध्ये 138 मजूर संस्था तसेच 29 गुत्तेदार व सुशिक्षित बेकार अभियंता 28 अधिकारी यांच्यावर एफ आय आर दाखल करून निलंबनाची कारवाई झाली. परंतु उप लोक आयुक्त कार्यालय मुंबई येथे दि. 12/ 3 /2020 ला सुनावणी द्वारे रमेश भताने विभागीय कृषी सहसंचालक सेवानिवृत्त व उपविभागीय कृषी अधिकारी विष्णू मिसाळ इतर 5 यांच्यासह गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले अशी माहिती काँग्रेसचे नेते वसंत मुंडे चेअरमन श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार नाशिक यांनी दिली.
सेवानिवृत्त विभागीय कृषी सहसंचालक रमेश भताने यांना राजकीय वरदहस्त असल्यामुळे गुन्हे दाखल करण्यास कृषी खात्यामार्फत विलंब करण्यात आला त्यावर काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी दि.14 /10 /2020 च्या कॉन्फरन्स ऑनलाईन सुनावणी द्वारे उपलोकायुक्त यांना विनंती केली आपल्याकडून गुन्हे दाखल करण्याचे आदेश देऊनही कृषी आयुक्त कार्यालयाकडून कारवाई करण्यात आली नाही असे निदर्शनास आणून दिल्यावर तात्काळ रमेश भताने यांच्यावर गुन्हा का दाखल केला नाही याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले बीड जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेमध्ये बोगस कामाचा फार मोठा घोटाळा असून गुत्तेदार व अधिकारी यांना राजकीय नेते सर्व स्तरातून वाचविण्यासाठी हस्तक्षेप होत असल्यामुळे काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी उप लोक आयुक्त कार्यालयात दि.14/10/ 2020 ला ऑनलाईन सुनावणी द्वारे त्यावेळेस विभागीय कृषी सहसंचालक व पूर्वीचे जिल्हा कृषी अधीक्षक सेवानिवृत्त रमेश भताने सह उपविभागीय कृषी अधिकारी विष्णू मिसाळ व प्रभारी जिल्हा कृषी अधीक्षक पदभार त्यांनी अनेक वेळा घेतलेला आहे. त्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर जलयुक्त शिवाराची नियमभाय बोगस कामे दाखवून बिले उचलल्या बाबत शासनाच्या कोणते निकषांचे पालन केले नाही दोन्ही चौकशीमध्ये दक्षता पथकामार्फत भ्रष्टाचार झाल्याचे जलयुक्त शिवारामध्ये बीड जिल्हा अंतर्गत सिद्ध झाला आहे. तरी तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश देऊनही विलंब का लावला यासंदर्भात चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे नेते वसंत मुंडे केली. परळी विधानसभा मतदारसंघ अंतर्गत योजनेमधील दोन्ही टप्प्यामध्ये चौकशी अंतर्गत 8 कोटी 36 लाख भ्रष्टाचार झाला हे कृषी खात्याच्या दक्षता पथकामार्फत सिद्ध झालेले आहे. त्यामध्ये 50 टक्के गुत्तेदार व 50 टक्के अधिकाऱ्याकडून वसूल करण्याचे आदेश देण्यात आले . परळी विधानसभा मतदार संघा अंतर्गत जलयुक्त शिवार योजने मध्ये 75 टक्के भ्रष्टाचार झाल्याचे आरोप काँग्रेसने काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी महाराष्ट्र शासनाकडे चौकशी साठी अर्ज केला होता, त्यात विधानसभा विधान परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित करून तज्ञ समिती नेमून एस आय टी द्वारे चौकशी करण्याची मागणी काँग्रेस नेते वसंत मुंडे यांनी केली होती. रमेश भताने सह 5 अधिकारी-कर्मचारी यांच्या विरोधात एफ आय आर दाखल करण्याचे आदेश दि 1 एप्रिल 2021 ला महाराष्ट्र शासनाकडून कृषी आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांना देण्यात आले आहेत. त्यावर तात्काळ पोलीस अधीक्षक बीड, जिल्हाधिकारी बीड यांनाही शासनाद्वारे कळविण्यात आलेले आहे, अशी माहिती काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page