लोंबकणा-या विद्युत वाहीन्यांनी  शेतकऱ्यांचा दुदैवी मृत्यू

Spread the love

पुर्णा शहर परिसरातील घटना;पोलीसांत घटनेची नोंद

पुर्णा,ता.२६(प्रतिनिधी)

जनावरांना चारा पाणी देण्यासाठी गेलेल्या एका ४५ वर्षीय शेतकऱ्याचा शेतातील लोंबकळत असलेल्या विद्युत वाहीन्यांचा शाॅक लागून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडल्याचे उडकीस आले आहे.याप्रकरणी पुर्णा पोलीस ठाण्यात (ता.२५) जुलै रोजी अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली आहे.

     राजेश नामदेव सोनवणे वय ४५ वर्षे रा.डाॅ.बाबासाहेब आंबेडकरनगर पुर्णा ता.पुर्णा जि.परभणी असं त्या मयत शेतकऱ्याचे नाव आहे.सदरील शेतकऱ्यांची शहरालगत शेती आहे.आखाड्यावरील जनावरांना चारा पाणी देण्यासाठी ते (ता.२३) जुलै रोजी सकाळी ११ वाजता आपल्या पत्नीला कल्पना देऊन शेतात गेले होते.दरम्यान ते रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरु केली.दरम्यान (ता.२५) जुलै रोजी शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास शोध घेत असलेल्या नातेवाईकांना त्याचा मृतदेह शेतात जाण्यासाठी खोदलेल्या नालीत पडलेल्या अवस्थेत आढळून आला.ही खबर पुर्णा पोलीसांकळवताच घटनास्थळी फौजदार श्रीनिवास पडलवार,जमादार आनंद सोनकांबळे, जमादार राहुल मोरे यांनी धाव घेऊन पहाणी करत मृतदेह ताब्यात घेत येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केला.दरम्यान संबंधित शेतकरी राजेश सोनवणे यांचा वीजेच्या धक्याने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.

सदरील शेतकऱी मागील दोन ते तीन दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार पुर्णा पोलिसात दाखल होती.दरम्यान तीन दिवसांनंतर त्यांचा मृतदेह शेतात आढळून आल्याने पुर्णा पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. घडलेल्या दुदैवी घटनेने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.मयत राजेश सोनवणे यांच्या पश्चात पत्नी दोन मुले,भाऊ भावजय,पुतणे असा मोठा परिवार आहे.घटनेचा तपास जमादार राहुल मोरे करत आहेत.

You cannot copy content of this page