धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात विकासकामांना गती; परळी मतदारसंघातील रस्ते होणार चकाचक

Spread the love

धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात विकासकामांना गती; परळी मतदारसंघातील रस्ते होणार चकाचक

मतदारसंघातील विविध रस्ते व पुलाच्या कामांच्या सुमारे 24 कोटी रुपयांच्या निविदा प्रसिद्ध

परळी (दि. 22) —- : परळीचे आमदार तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत विविध विकास कामांना गती प्राप्त झाली असून, मतदारसंघातील विविध महत्वाचे रस्ते व पुलांच्या दुरुस्ती व बांधकामाच्या सुमारे 24 कोटी रुपयांच्या निविदा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

एकीकडे कोविड विरुद्धच्या निकराच्या लढाईत सर्व अस्त्र व शक्ती पणाला लाऊन लढा देत असताना दुसरीकडे मतदारसंघातील विविध विकासकामांना गती देण्याकडेही धनंजय मुंडे यांनी लक्ष केंद्रित केले आहे.

त्यांच्या माध्यमातून पोहनेर-सिरसाळा रस्ता रुंदीकरण व मध्ये लहान पुलांचे बांधकाम करणे यासाठी 7.59 कोटी रुपये, हिंगणी-आमला-कांनापूर-म्हातारगाव-सोनहिवरा रस्ता दुरुस्ती व पुलांचे बांधकाम यासाठी 5.22 कोटी, देवळा-धानोरा-मूडेगाव-सुगाव-नांदगाव-बरदापुर-हातोला-तळेगाव रस्त्याची सुधारणा करणे कामी 4.92 कोटी रुपये, उजनी-निरपना पुलांचे बांधकाम 2.54 कोटी रुपये, पोहनेर-सिरसाळा-मोहा-गर्देवाडी राज्य मार्ग रुंदीकरण काँक्रीटीकरण व रस्ता दुभाजकासह सुधारणा करणे साठी 1.73 कोटी रुपये, जोडवाडी-धसवाडी मध्ये लहान पुलांचे बांधकाम यांसाठी 98 लाख रुपये व 94 लाख रुपये असे एकूण सुमारे 24 कोटी अंदाजित रकमेच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

दरम्यान सदर निविदा प्रक्रिया तातडीने राबवून पर्यंत दर्जेदार पद्धतीने व कमीत कमीत वेळेत ही कामे पूर्ण केली जावेत याबाबत ना. धनंजय मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.

You cannot copy content of this page