श्री जटाशंकर मंदिरातील दानपेट्या फोडल्या

Spread the love

सी सी टीव्हीचे डिव्हीआर चोरट्यांनी केले लंपास

डोंगरकडा/प्रतिनिधी;

हिंगोली जिल्ह्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या डोंगरकडा येथील स्वयंभू श्री जटा शंकर मंदिरातील चोरट्यांनी काल रात्री दानपेट्या फोडून रक्कम पळविल्याची घटना ९ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री नंतर घडली.विशेष म्हणजे मंदिरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही चे डिव्हीआर चोरट्यांनी दुसर्‍यांदा पळविले असल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
डोंगरकडा येथील स्वयंभू श्री जटा शंकर देवस्थान हे सर्वदुर परिचित असलेले भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिरात भाविकांची नेहमीच येजा असते आणि त्यातून आलेले भाविक हे (बहुतांश) हे गुप्तदान करीत असतात त्यामुळे मंदिराचे विश्वस्त हे दर महिन्याला दानपेट्या मधील निघालेली रक्कम किंवा अन्य धातू वस्तू हे मंदिराच्या बँकेतील खात्यावर जमा करत असतात त्यातून अनेक धार्मिक कार्यक्रम, विवाह सोहळा, नैसर्गिक आपत्ती साठी निधी यातूनच करतात, सदरील मंदिरास ‘ क ‘ दर्जाचे पर्यटन म्हणून शासनाची मान्यता मिळाली आहे. मंदिराच्या दानपेट्या फोडणारे मात्र अजूनही पोलिसां पासून कोसो दूर : डोंगरकडा येथील स्वयंभू श्री जटा शंकर मंदिरातील दान पेट्या चोरट्या कडून फोडण्याची ही काही पहिली वेळ नाही या अगोदरही तीन ते चार वेळा दानपेट्या फोडल्या आहेत आणि तपास म्हणून श्वान, फिंगर प्रिंट एक्सपर्ट यांनी तपास करूनही चोरटे अजूनही पोलिसांना मिळेनात मात्र यावेळी आखाडा बाळापूर पोलीस त्यांचा शोध घेतलीच अशी चर्चा आहे.सदरील चोरीच्या घटनेची तक्रार दाखल करण्यासाठी मंदिराचे विश्वस्त पोलीस चॉकी मध्ये गेले असून पुढील कार्यवाही सुरू आहे.

You cannot copy content of this page