अभिनयाचा ‘नटसम्राट’ हरवला जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन

Spread the love

गोव्यात ७५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; चाहत्यांत शोककळा

बिड/प्रतिनिधी (प्रकाश वर्मा)

जबरदस्त अभिनयाने चित्रपटसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं आज आकस्मिक निधन झालं. गोवा येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने नाना पाटेकर यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७५ वर्षांचे होते

आपल्या दमदार अभिनयासोबतच खास संवादफेक, आक्रमक देहबोली आणि वेगळ्या शैलीमुळे नाना पाटेकर यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. मात्र, अभिनेता म्हणून प्रसिद्धी मिळवण्याआधी नाना पाटेकर यांनी भारतीय लष्करातही सेवा बजावली होती.नाना पाटेकर यांचा जन्म १९५१ मध्ये एका मराठी कुटुंबात झाला. अत्यंत संघर्षमय परिस्थितीत त्यांनी आपल्या आयुष्याची आणि करिअरची सुरुवात केली. वयाच्या अवघ्या १३व्या वर्षापासून त्यांनी काम करण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीच्या काळात आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. सिद्धार्थ कनन यांच्या पॉडकास्टमध्ये नाना पाटेकर यांनी सांगितलं होतं की, करिअरच्या सुरुवातीच्या काळात ते दिवसातून केवळ एक वेळच जेवायचे आणि त्यांना महिन्याला अवघे ३५ रुपये मिळायचे.

नाना पाटेकर यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात ‘गमन’ या चित्रपटातून केली. या चित्रपटात त्यांनी नकारात्मक भूमिका साकारली होती. मात्र, १९८६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अंकुश’ या चित्रपटामुळे त्यांना मोठी ओळख मिळाली. या चित्रपटातील त्यांचे डायलॉग्स आणि अभिनयशैली प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली.यानंतर ‘परिंदा’, ‘क्रांतिवीर’, ‘अग्निसाक्षी’, ‘तिरंगा’, ‘खामोशी’, ‘भूत’ यांसारख्या अनेक चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची ताकद दाखवून दिली. ‘अग्निसाक्षी’मधील भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. नाना पाटेकर यांना त्यांच्या कारकिर्दीत तीन राष्ट्रीय पुरस्कार आणि चार फिल्मफेअर पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. २०१३ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं.

पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकांनीही मिळाली लोकप्रियता नाना पाटेकर यांच्या खास संवादफेकीमुळे आणि त्यांच्या आक्रमक अभिनयशैलीमुळे त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये पोलिस अधिकाऱ्यांच्या भूमिका साकारल्या. त्यांच्या तोंडी असलेले संवाद प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाले होते. ‘शागिर्द’, ‘अब तक छप्पन’, ‘टॅक्सी नंबर ९२११’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांच्या अभिनयाचं विशेष कौतुक झालं. ‘वेलकम’मधील उदय शेट्टी ही त्यांची विनोदी भूमिका तर आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.अभिनेता होण्याआधी लष्करात होते कॅप्टन नाना पाटेकर यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांचा भारतीय लष्कराशी असलेला संबंध. १९९० मध्ये त्यांनी इंडियन टेरिटोरियल आर्मीमध्ये कॅप्टन म्हणून प्रवेश केला होता. ‘प्रहार : द फायनल अटॅक’ या चित्रपटात मेजरची भूमिका साकारण्यासाठी त्यांनी तब्बल तीन वर्षे लष्करी प्रशिक्षण घेतलं होतं. या काळात त्यांनी जनरल व्ही. के. सिंग यांच्यासोबतही काम केलं. १९९९ मध्ये कारगिल युद्धाच्या काळात नाना पाटेकर यांनी अभिनयापेक्षा देशसेवेला प्राधान्य दिलं. त्यांनी मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटसोबत काम करत युद्धकाळात आपलं योगदान दिलं होतं. त्यामुळे पडद्यावर सैनिकाच्या भूमिका साकारणाऱ्या नाना पाटेकर यांचा लष्कराशी असलेला संबंध हा त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा अध्याय ठरला.नाना पाटेकर अभिनयासोबत सामाजिक क्षेत्रामध्येही कार्यरत होते. त्यांनी नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी सामाजिक कार्य सुरू केले होते. त्यांच्या निधनानंतर आता सिनेइंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे

You cannot copy content of this page