गणेशपारचा नविन ट्रान्सफरचा जिव्हाळ्याचा प्रश्न ना.धनंजयजी मुंडे साहेब आणि गटनेते वाल्मिकअण्णा कराड यांच्यामुळे सुटला!

Spread the love

गणेशपारचा नविन ट्रान्सफरचा जिव्हाळ्याचा प्रश्न ना.धनंजयजी मुंडे साहेब आणि गटनेते वाल्मिकअण्णा कराड यांच्यामुळे सुटला!

परळीच्या जुन्यागावभागातील गणेशपार म्हणजे दाटवस्ती असणारा विभाग,गणेशपारला रामदाशी यांच्या दुकानाजवळ खूप जुने ट्रान्सफर होते यावर किमान 300 ते 400 वीजकनेक्शन होते,अनेकवेळा ते ट्रान्सफर नादुरुस्त व्हायचे.ऑइल लीक व्हायचे सातत्याने वीजपुरवठा खंडीत व्हायचा,आज या ट्रान्सफार्मरने दुपारी अचानक अखेरचा श्वास घेतला आणि ते फेल झाले.

सदरील बाब गणेशपारवासियांनी व आम्ही सर्वांनी ना.धनंजयजी मुंडे साहेब व गटनेते वाल्मिकअण्णा कराड यांच्या निदर्शनास आणून दिली,त्यांनी तात्काळ कार्यकारी अभियंता यांना 330 KV चें ट्रान्सफार्मर उपलब्ध करुन देण्यास सांगितले आणि अवघ्या 1 तासात नविन ट्रान्सफार्मर गणेशपारला डेरेदाखल झाले..

जनसेवा असावी तर धनुभाउंसारखी आणि अर्जुन असावा वाल्मिकअण्णा सारखा,गणेशपारचा विजेचा प्रश्न नविन ट्रांसफार्मर देवून सोडविल्याबद्दल शहराध्यक्ष बाजीराव धर्माधकारी,माजी नगराध्यक्ष दिपकनाना देशमुख,प्रतापदादा देशमुख,नंदकुमार रामदाशी,प्रकाश वर्मा,केदार देशमुख,चारुदत्त करमाळकर,गणेश सावंत,अनंत कुलकर्णी,विनोद बांगर,नवल वर्मा,वैजनाथ जोशी,अनिल बांगर,विजय सावजी,शेख अकबर, आकाश कंडले,केशव बडवे,सागर नव्हाडे, श्रवणकुमार चौधरी यांच्या व तमाम गणेशपारवासियांकडून मनःपूर्वक आभार!

You cannot copy content of this page