नांदेड-लातुर नव्या रेल्वे मार्गाचा लोकेशन प्लॅन मंजुरसर्वेक्षण प्रगतीपथावर; रेल्वे सुत्रांची माहीती

Spread the love

नांदेड-लातुर नव्या रेल्वे मार्गाचा लोकेशन प्लॅन मंजुर
सर्वेक्षण प्रगतीपथावर; रेल्वे सुत्रांची माहीती
पूर्णा/प्रतिनिधी
रेल्वे मंत्रालयाने मागील अर्थसंकल्पात नांदेड -लातुर १०४ किमी लांबीचा रेल्वे मार्ग तयार करण्यास मंजुरी दिली होती, प्रस्तावित मार्गाचा लोकेशन संबंधित प्लॅन मंजूर केला असुन यामार्गाच्या सर्वेक्षणाचे कार्यही प्रगतीपथावर असल्याचे रेल्वे सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समजते.
नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री असताना खा. अशोकराव चव्हाण यांनी सुमारे १०४ किलोमीटर लांबीच्या नांदेड-लातूर रोड नवीन रेल्वे मार्गासाठी पुढाकार घेऊन केंद्र व राज्य सरकारचा संयुक्त उपक्रम ‘महारेल’च्या माध्यमातून प्राथमिक अहवाल तयार करून घेतला होता. त्यानंतर राज्य सरकारकडे पाठपुरावा करून हा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचारार्थ पाठविण्यात आला होता. या प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर यामार्गाचा फायनल लोकेशन सर्व्हे सुरु असून, त्याचा अहवाल तयार झाल्यानंतर या प्रकल्पाबाबत पुढील निर्णय घेतला जाईल, असे रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंग यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.सुमारे २ हजार २५४ कोटी रुपयांच्या नांदेड-बिदर रेल्वे मार्गासाठी निर्धारित खर्चासह तपशीलवार प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार झालेला आहे. हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य करण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या महायुती सरकारकडून मोफत जमीन तसेच बांधकामाचा ५० टक्के खर्च वाटून घेण्यासाठी संमती केंद्राकडे प्राप्त झाली आहे. मात्र, कर्नाटक सरकारची संमती अद्यापही प्रलंबित असल्याचे समजते.

You cannot copy content of this page