महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ आज शरद पवार यांची सभा; मोठ्या संख्येने उपस्थित राहावे-बहादुरभाई, लुगडे, ॲड. देशमुख, पालीवाल, विभुते

Spread the love

महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ आज शरद पवार यांची सभा; मोठ्या संख्येने उपस्थित राहावे-बहादुरभाई, लुगडे, ॲड. देशमुख, पालीवाल, विभुते

परळी,(प्रतिनिधी):- परळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, काँग्रेस, शिवसेना उबाटा प्रणित महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष देशाचे मा.कृषी मंत्री खा. शरद पवार यांच्या जाहीर सभेचे परळीत आज दि.9 नोव्हेंबर 2024 रोजी आयोजन करण्यात आले आहे. या विराट सभेस महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच परळी विधानसभा मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन काँग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद हनीफ सय्यद करीम उर्फ बहादुर भाई, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे परळी तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज, शहराध्यक्ष ॲड.जीवनराव देशमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे परळी तालुका प्रमुख भोजराज पालीवाल, शहराध्यक्ष राजेश विभुते यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे केले आहे.

  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष देशाचे मा. कृषिमंत्री खा. शरद पवार यांची 9 नोव्हेंबर रोजी परळी शहरातील मोंढा मैदान येथे दुपारी 1 वा. जाहीर सभा होणार आहे. महाविकास आघाडीचे बळी विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ होणाऱ्या जाहीर सभेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा महिला आघाडी खा.फौजिया खान, बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप क्षीरसागर, परळी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख, केज विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांच्यासह पक्षाचे  नेते, पदाधिकारी  उपस्थित राहणार आहेत. परळी शहरात होणाऱ्या या सभेसाठी परळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष, काँग्रेस व मित्र पक्षांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तसेच परळी विधानसभा मतदारसंघातील मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन काँग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद हनीफ सय्यद करीम उर्फ बहादुर भाई, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे परळी तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज, शहराध्यक्ष ॲड. जीवनराव देशमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे परळी तालुका प्रमुख भोजराज पालीवाल, शहराध्यक्ष राजेश विभुते यांनी एका प्रसिद्धी पत्रकारद्वारे केले आहे.

You cannot copy content of this page