महायुती सरकारला सत्तेतून खाली खेचा-शिवसेना उपनेते खा.जाधव
पूर्णेत मवीआचे उमेदवार विशाल कदम यांच्या प्रचारार्थ पक्षप्रवेश व कार्यकर्ता मेळावा
पूर्णा /प्रतिनिधी
सर्वत्र महागाईने जनता त्रस्त आहे.शेतमालाचे भाव पाडले, तरुणांना रोजगार नाही.सत्ताधारी महायुती केवळ सत्तेची पोळी भाजण्यासाठी जाती जातीत व धर्मा धर्मात तेढ निर्माण करून राजकीय स्वार्थ साधण्याचे स्वप्न पहात आहे.त्यामुळे भारतीय जनता पक्ष व महायुती पासून सावध रहा सर्व सामान्य जनतेला देशोधडीला लावणा-या महायुती सरकारला सत्तेतून खाली खेचा असे आवाहन शिवसेना उपनेते (ठाकरे गट)खासदार संजय जाधव यांनी केले.
पूर्णा येथे सुमन मंगल कार्यालयात सोमवारी (ता. ११) शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते खासदार संजय उर्फ बंडु जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश सोहळा पार पडला यावेळी खा.जाधव बोलत होते. प्रसंगी व्यासपीठावर गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे मविआचे उमेदवार विशाल विजयकुमार कदम,मा.सभापती बालाजी देसाई, पैलवान मारोती बनसोडे,राष्ट्रवादी काँग्रेसचे रितेश काळे,मा.नगराध्यक्ष संतोष एकलारे,जाकीर कुरेशी, उपजिप्र.दशरथ भोसले, तालुकाध्यक्ष शहाजी देसाई, काँग्रेसचे प्रल्हाद पारवे, संदीप ढगे, ता.प्र.काशिनाथ काळबांडे, संचालक भगवान धस, सभापती बालाजी खैरे, , सभापती अशोक बोकारे,उप सभापती नारायण पिसाळ, काँग्रेस शहराध्यक्ष शेख अहमद, शाम कदम, अय्युब कुरेशी, गोपाळ अंभोरे, शहरप्रमुख मुंजाभाऊ कदम, बंडूआप्पा बनसोडे, शेख खुद्दुस शेख बशीर, व्यंकटराव पौळ, अमजद नुरी, बालाजी वैद्य, आदी उपस्थित होते. प्रारंभी टि पॉईंट पासून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. संदीप ढगे व त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी यावेळी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पुढे बोलताना खासदार जाधव म्हणाले शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना लुटणाऱ्या रत्नाकर गुट्टे यांना जनतेत जाऊन मत मागण्याचा नैतिक अधिकार नाही. शेतकऱ्यांच्या नावावर हजारो कोटीचे कर्ज घेऊन शेतकऱ्यांचे सिवील खराब करणाऱ्याला या निवडणुकीत धडा शिकवा. अनेकांच्या जमिनी, भूखंड हडप करून सामान्य जनतेवर दादागिरी करणाऱ्या रत्नाकर गुट्टे व सोयाबीन कापूस यांचे भाव पाडून शेतकऱ्यांना लूटणार्या महायुतीला मतदानातून अद्दल घडवा असे आवाहन केले. यावेळी त्यांनी विशाल कदम यांच्या कामाचा गौरव केला. तसेच संदीप ढगे, इलियास पठाण, फेरोज पठाण आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.जनतेला सामान्य जनतेतील लोकप्रतिनिधी हवा आहे त्यामुळे या निवडणुकीत परिवर्तन होणार असून शेतकऱ्याचा पोरगा विधानसभेत जाणार आहे अशा भावना संदीप ढगे यांनी व्यक्त केल्या. सूत्रसंचालन जगन्नाथ कदम व ॲड. राजेश भालेराव यांनी केले. अशोक वाघमारे यांनी आभार मानले.यावेळी मतदारसंघातील महाविकास आघाडीतीचे कार्यकर्ते पदाधिकारी मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—————————————————————
जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबद्ध-कदम
मतदारसंघांच्या विकासाच्या माझ्या संकल्पना आहेत. त्या दृष्टीने मी नियोजन केले आहे. महाविकास आघाडीतील व सर्व जाती धर्मातील जनतेला सोबत घेऊन मी गंगाखेड, पालम, पूर्णा या तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी व जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबद्ध राहील.आपल्या हक्काचा माणूस म्हणून आपण मला मतदान रुपी आशीर्वाद देऊन सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन उमेदवार कदम विशाल विजयकुमार यांनी केले.