श्री दाजीगुरु महाराज संस्थानचे रौप्य महोत्सवी सोहळा श्रीक्षेत्र धनगर टाकळी येथे यज्ञमंडपाचे भूमिपूजन
पूर्णा(प्रतिनिधी)
श्रीक्षेत्र धनगर टाकळी (ता.पूर्णा) येथे श्री सद्गुरु वेंकटेश दाजीमहाराज संस्थान, सच्चिदानंद वेद स्वाध्याय प्रतिष्ठान तसेच श्रीदाजीमहाराज सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित. श्री सद्गुरु वेंकटेश दाजी महाराज यांचा १६५ वा जन्मोत्सव तसेच सच्चिदानंद वेद स्वाध्याय प्रतिष्ठान च्या रौप्य महोत्सवा निमित्त दिनांक ६ जानेवारी ते १४ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.सदर कार्यक्रमात श्रीमद् भागवत कथा सप्ताह,पंचकुंडात्मक लक्ष्मीनारायण महायज्ञ, नामवंत कीर्तनकारांचे हरिकीर्तन सप्ताह, अभंगवानी, महा अन्नदान, वेद -शास्त्र – सामाजिक पुरस्कार वितरण,अशा अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांसमवेतच नेत्र तपासणी शिबिर,रक्तदान शिबिर,आरोग्य तपासणी शिबिर,अशा अनेक भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
यंदा पार पडणाऱ्या रौप्य महोत्सवी सोहळ्याच्या अनुषंगाने श्रीक्षेत्र धनगर टाकळी येथे गुरुकुल परिसरात रविवार (दि.२२) रोजी यज्ञ मंडपाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून गंगाखेड येथील सौ.रेखाताई रत्नाकरराव गुट्टे. यांची प्रमुख उपस्थिती तसेच संस्थानाधिपती श्री उमेश महाराज टाकळीकर,कार्यवाह श्री.अवधूतमहाराज टाकळीकर, सरपंच सौ. मीराताई साखरे, उपसरपंच मगदूम सहाब, गुरुकुलाचे प्रमुख विश्वस्त डॉ.श्री.हरिभाऊ पाटील,उद्योजक श्री.एस.आर.काबरा, रामकिशन रौंदळे,श्री.अशोक गुजराती, राजेश धूत,पत्रकार प्रवीण देशपांडे इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.गणेश जोशी यांनी केले.
तसेच सदर कार्यक्रमास धनगर टाकळी येथील ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी अनेक राजकीय क्षेत्रातील धार्मिक क्षेत्रातील सांस्कृतिक क्षेत्रातील मोठमोठ्या दिग्गज नामवंत मंडळींची उपस्थिती सोबतच रोज हजारोंच्या संख्येने भक्त परिवार उपस्थित राहणार आहे. सदर भूमिपूजन कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सौ ज्योती जोशी, श्री जयदीप कोपरेकर सौ.सोनल कोपरेकर, प्रांजली टाकळीकर. इत्यादींनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी सर्व भाविक मंडळींनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संस्थानाधिपती वेदमूर्ती श्री उमेश महाराज टाकळीकर यांनी केले आहे.