अवैध रेतीच्या टिपरवर पोलीसांची कारवाई

Spread the love

ताडकळस/प्रतिनिधी
ताडकळस पोलीस ठाण्याच्या हद्दीत दस्तापुर शिवारात अवैध रेती वाहतूकीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करुन ताडकळस पोलीसांत गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी सुरेश सुभाषराव देशमुख (वय ३३) रा. लोहगाव व वाहनमालक हा रविवारी दीड वाजण्याच्या सुमारास दस्तापूर शिवारात अवैध रेतीची वाहतूक करताना आढळून आला. या कारवाईत टाटा कंपनीचा टिप्पर व त्यातील अडीच ब्रॉस रेती असा एकूण ५ लाख १२ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार दिपक मुदीराज यांच्या फिर्यादीवरून ताडकळस पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पोलीस अधिक तपास करीत आहेत.हि कारवाई पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेच्या सहायक पोलिस निरिक्षक जायभाये, हवालदार रवीकुमार जाधव, दीपक मुदीराज,अंमलदार शरद सावंत व नामदेव धोत्रे, अमोल हिवरे यांनी मिळून केली.


You cannot copy content of this page