तळीरामांनो सावधान;परभणी पोलीसांच्या ड्रंक अँड ड्राइव्ह मोहीमेला सुरुवात
२९ ते ३१ डिसेंबर कालावधीत होणार कारवाई; नववर्षाचे अपघात मुक्त स्वागत करण्याची प्रयत्न
पूर्णा(प्रतिनिधी)
चालू वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाई सज्ज झाली आहे.मात्र अतिउत्साही तळीरामांमुळे अपघाताचे प्रमाण वाढते त्यामुळे त्यांना सावधानतेने नव्या वर्षाचे स्वागत करावे लागणार आहे.कारण हा आनंद अपघात मुक्त करण्यासाठी परभणी पोलिसांनी कंबर कसली आहे. पोलीसांनी जिल्ह्यात .ड्रंक अँड ड्राइव्ह मोहीमेला सुरुवात केली आहे.सदरील मोहीम २९ ते ३१ डिसेंबर दरम्यान राबविण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
नव्या वर्षाचे स्वागत करताना स्वतःला तसेच इतरांना कोणाला त्रास होणार नाही याची काळजी तळीरामांकडून घेतली जात नाही..विशेषतः तरुण वर्गाकडून उत्साहाच्या भरातवेगाने दुचाकी चालवणे क्षमतेपेक्षा अधिक व्यक्ती वाहनांवर बसवून दुचाकी चालवणे स्टंटबाजी करणे, मध्य प्राशन करून वाहन चालवणे, अशा प्रकारचे वर्तन घडवले जाते. त्यामुळे अपघात होऊन स्वतःला तसेच इतरांना देखील इजा होण्याची शक्यता असते.त्यामुळे येत्या ३१ डिसेंबर हा अपघात मुक्त साजरा करण्यासाठी परभणी पोलीस दलाने पुढाकार घेतला आहे.त्यासाठी २९ डिसेंबर पासून मध्य प्राशन करून वाहन चालवनाऱ्या वाहनचालकांच्या विरोधात ड्रंक अँड ड्राइव्ह ची विशेष मोहीम ३१ डिसेंबर पर्यंत हाती घेण्यात आली आहे.त्यासाठी पोलीसांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी लावली आहे. कोणीही मद्यप्राशन करून वाहन चालू नये त्याचप्रमाणे वेदकारपणे वेगात स्टंटबाजी करत वाहन चालवून उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.असे आवहान देखील पोलीसांनी केले आहे.