परभणी;१ व २ जानेवारी रोजी तब्लिगी इज्तेमा लाखो भाविक येणार;तयारी अंतिम टप्प्यात

Spread the love

परभणी(प्रतिनिधी)


परभणी येथील जिंतूर रस्त्यावर १ व २ जानेवारी रोजी तब्लिगी इज्तेमा पार पडणार आहे.परभणी व हिंगोली या दोन जिल्हयासाठी आयोजित केलेल्या तब्लिगी इज्तेमासाठीची तयारी जवळपास अंतीम टप्प्यात आली असून याधार्मिक इज्तेमासाठी किमान अडीच लाखांवर भाविक उपस्थित राहतील असा अंदाज आहे.
जिंतूर रस्त्यावरील ८० एक्कर जमीनीवर गेल्या दीड-दोन महिन्यांपासून हजारो स्वयंसेवकांनी रात्रंदिवस श्रमदान करीत जमीनीच्या सपाटीकरणापासून ते भव्यदिव्य शामीयाना उभारणीपर्यंतचे काम पूर्ण केले आहे. विशेषतः मुख्य कार्यक्रमासाठी भव्य असा सभामंडप उभारण्यात आला आहे. मुख्य सभामंडपात एकाच वेळी लाखांपेक्षा अधिक नागरीक बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे, त्याबाजूला भोजनगृहासह अन्य शामीयानेसुध्दा उभारण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे भावीकांच्या वाहनांसाठी पार्किंग व्यवस्थाही करण्यात आली असून इज्तेमा स्थळी चारचाकी व दुचाकी वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग असणार आहे. पार्किंग सांभाळण्यासाठी हजारो स्वयंसेवकांना दोन्ही बाजूंनी जबाबदारी निश्‍चित करून देण्यात आली आहे.
तसेच पेंडॉलमध्ये व्यवस्थेसाठी स्वयंसेवक राहणार आहे. इज्तेमासाठी स्वच्छतागृह उभारणे, लाईट, ध्वनियंत्रणा आदी काम जोमाने सुरू आहे. शहरातील अनेक स्वयंसेवकांना स्वतंत्रपणे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. भाविकांनावजुसाठी धुण्यासाठी व स्वच्छतेसाठी व्यवस्था गुसलखाने, जेवणासाठी दावत सहा झोन बनविण्यात आले असुन प्रत्येक झोनमध्ये एका वेळी हजारो भाविकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
इज्तेमा स्थळी विद्युत पुरवठा सुरळीत सुरू राहावा म्हणून उच्च क्षमतेचे विद्युत ट्रान्सफार्मर तसेच विज पुरवठा काही कारणास्तव खंडित झाल्यास यासाठी जनरेटर बसविण्यात आले मैदानाच्या चारही बाजूंनी अद्ययावत ध्वनियंत्रणा, चोहीकडे रोषणाई साठी फोकस बसवीण्यात आले आहे. इज्तेमा ठिकाणी कुणी आजारी किंवा दुखापत झाल्यास पडल्यास त्यासाठी रुग्णालयसह उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टर्स, औषधोपराची व रूणवाहिकाची व्यवस्था केली जाणार आहे.

You cannot copy content of this page