Hingoliपोलिस कर्मचारी गोळीबार प्रकरण;पत्नी, मेहुण्यानंतर आज सासूसाचाही मृत्यू
हिंगोली(प्रतिनिधी)
Hingoli Crime News :हिंगोलीतील पोलीसHingolipolice कर्मचाऱ्याने केलेल्या गोळीबार प्रकरणातील पत्नी आणि मेहुण्याच्या मृत्यू नंतर जखमी असलेल्या सासूचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. .
हिंगोली पोलीस दलात कार्यरत असलेल्या विलास मोकाडे याने घटस्फोटाच्या कारणावरून पोलीस ठाण्यातून सरकारी पिस्तूल चोरून शहरातील प्रगतीनगर भागात विलास मुकाडे याचे सासू-सासरे कुटुंबासह वास्तव्यास होते. तिथे विलास मुकाडे याची पत्नीदेखील गेली होती. सततच्या भांडणामुळे घटस्फोट घेण्याच्या मुद्द्यावरुन त्यांच्यात वाद झाला होता. तिथे त्याने पत्नी मयुरी मोकाडे, सासू वंदना धनवे आणि मेहुना योगेश धनवे आणि स्वतःचा मुलगा श्रेयश मुकाडे यांच्यावर गोळीबार केला होता. या गोळीबारामध्ये पत्नीचा जागीच मृत्यू झाला होता, त्यानंतर काल मेव्हणा योगेश धनवे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर आज सासू वंदना धनवे यांचाही उपचारात दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळं या गोळीबार प्रकरणातील मृत्यूची संख्या 3 वर पोहोचली आहे. त्याच वादातून हिंगोली पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या विलास मुकाडे याने कुटुंबीयांवर गोळीबार केला. आरोपी विकास मुकाडे याने चार राऊंड फायर केले होते. घटनेनंतर काही तासातच पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या होत्या.