सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी परभणीत शनिवारी सर्व पक्षीय मुकमोर्चा

Spread the love

परभणी/प्रतिनिधी

संतोष देशमुख यांच्या निघृण हत्या करणाऱ्या आरोपींना तातडीने अटक करून त्यांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी शनिवारी (दि.४) परभणीमध्ये सर्वपक्षीय, सर्वजातीय, सर्वधर्मीय मोर्चा सकाळी ११ वाजता नूतन महाविद्यालय येथून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत निघणार आहे.
या मोर्चामध्ये स्व. संतोष देशमुख यांचे कुटुंबीय तसेच मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील, आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनवणे, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार संदीप क्षीरसागर, ज्योतीताई मेटे व स्थानिक परभणी जिल्हा प्रतिनिधी, खासदार, आमदार उपस्थित राहणार आहेत. स्व. संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी आज सर्वपक्षीय, सर्व समाज आणि संघटनांची एकत्र बैठक घेण्यात आली. बैठकीच्या सुरुवातीला सर्वांनी स्व. देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण केली. बीड जिल्ह्यातील आपल्या बांधवाला न्याय देण्यासाठी तसेच जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारी, दहशत व जातीयवाद मोडीत काढण्यासाठीया मोर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. नूतन महाविद्यालय जिंतूर रोड येथुन महाराणा प्रताप चौक शनी मंदिर नाना पेठ कॉर्नर- शिवाजी चौक गांधी पार्क- नारायण चाळमार्गे महात्मा फुले पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून या भव्य मोर्चाला सुरुवात होणार आहे. या होणाऱ्या मुक महामोर्चासाठी परभणी जिल्ह्यातील तालुक्यातील सर्व जाती-धर्मातील बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सर्व पक्ष संघटना मित्र मंडळ सकल मराठा समाज यांच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page