रिपाई नेते प्रकाशदादा कांबळे यांना नामांतर योद्धा पुरस्कार जाहीर
परभणी (प्रतिनिधी)
परभणी येथील धम्म मैत्री संवाद अभियान भीमा कोरेगाव शौर्य विजय दिन व डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या निमित्ताने दिला जातो पुरस्कार बी रघुनाथ सभागृहात दि.19 जनेवारी 2025 रोजी होणाऱ्या शौर्य प्रेरणा अभिवादन सोहळ्यात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.धम्म मैत्री संवाद अभियानाच्या वतीने दरवर्षी नामांतर लढ्यातील एका योद्ध्याचा सन्मान केला जातो.आता पर्यंत पँथर के आर गायकवाड, राणूबाई वायवळ,माधवराव हतागळे, संपत मस्के, प्रभाकर लंगोटे, बी एच कांबळे, विजय वाकोडे यांना सन्मानीत केले आहे.या वर्षीचा नामांतर योद्धा पुरस्कार पँथर चळवळीत आणि नामंतराच्या लढ्यात मुंबईच्या जेल भरो आंदोलनात सहभागी झाले. 21 दिवस नाशिकच्या कारागृहात सजा भोगली.ते दलीत पँथर चे जिल्हाध्यक्ष पूर्णा नगरीचे माजी उपनगराध्यक्ष प्रकाशदादा कांबळे आज समितीने जाहिर केला आहे.कांबळे यांना जाहीर झालेल्या पुरसकाराचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.