महिला मंडळाने साजरी केली क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती
पूर्णा(प्रतिनिधी)-
येथे शहरातील महिला मंडळाच्या पुढाकाराने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९४ वी जयंती साजरी करण्यात आली.पूर्णा शहरातील डॉ आंबेडकर चौक या ठिकाणी दि ३ जानेवारी रोजी सकाळी ११ वा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९४वी जयंती साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माजी नगरसेविका गयाबाई खंदारे प्रमुख पाहुण्या म्हणून माजी नगरसेविका विजयाताई कापसे प्रमुख उपस्थिता मध्ये भन्ते पंयावंश रिपाइनेते प्रकाश कांबळे उत्तम खंदारे सुनिल मगरे तुषार गायकवाड श्रीकांत हिवाळे बौद्धाचार्य त्र्यंबक कांबळे अतूल गवळी अमृत कऱ्हाळे आदि उपस्थित होते.
डॉ बाबासाहेब आंबेडकर व जिजाऊ साहेब क्रांतीज्योती सावित्रीबाई रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी उपस्थितांच्या व महिला मंडळाच्या वतीने अभिवादन करण्यात अभिवादन गीत सादर करण्यात आली भन्ते पंयावंश यांनी त्रिशरण पंचशिल दिले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्र संचालन संयोजक मंजुषाताई मुकूंद पाटील यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सविता आहिरे विशाखा एंगडे सुकेशनी भुजबळ अरुणाबाई कांबळे कांताबाई साळवे मुक्ताबाई पंडित मिराबाई बोधक सुशिलाबाई जमदाडे सुमिता घूले रमाबाई कऱ्हाळे रमाबाई कुन्हे द्रोपदाबाई सोनूले शिवकन्या बाई कांबळे यांच्या सह महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाला महिला व पुरुष मंडळीनी मोठ्या संख्येने उपस्थिती होती