महापुरुषांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा यश निश्चित मिळेल-.प्रा राहुल गिरी

Spread the love

पूर्णेतील श्री गुरुबुद्धिस्वामी महाविद्यालय ‘स्पंदन स्नेहसंमेलन २०२५’

पूर्णा/प्रतिनिधी
आपल्या आई-वडिलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र कष्ट करावे.सिने तारकांचे आदर्श न घेता महापुरुषांच्या विचाराचा आदर्श घेतला तर आयुष्याचे सार्थक होईल.आई वडील व गुरु यांच्या पेक्षा दुसरा कोणता मोठा गुरु नाही.ज्यांच्या विचाराचा प्रभाव तुमच्यावर आहे तेच तुमच्या आयुष्याला कालाटणी देणारे गुरु आहेत. परिस्थिती तुम्हाला संपवत नसते ती तुम्हाला कष्ट करण्यासाठी तयार करून उच्च ध्येय सध्य करण्यासाठी तयार करत असते.असे प्रतिपादन प्रा. राहुल गिरी यांनी केले .
पूर्णा येथील श्री गुरुबुद्धिस्वामी महाविद्यालयात मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या “स्पंदन २०२५”वार्षिक स्नेहसंमेलनाचा शनिवारी ११ रोजी समारोप करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष श्री गुरु डॉ.नंदीकेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, मंचावर जेष्ठ संचालक कोषाध्यक्ष उत्तमरावजी कदम,डॉ.दत्तात्रेय वाघमारे,सचिव अमृतराज कदम, सहसचिव गोविंदराव कदम, प्रमुख युवा वक्ते म्हणून मा. राहुल गिरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के. राजकुमार,उपप्राचार्य डॉ. गजानन कुरुंदकर व डॉ. शिवसांब कापसे पर्यवेक्षक उमाशंकर मिटकरी, उपप्राचार्य अभाजी खराटे यांची उपस्थिती सह बाळासाहेब कुलकर्णी डॉ.विजय पवार, डॉ. वृषाली आंबटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात झाली.प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. के. राजकुमार यांनी महाविद्यालयातील घेण्यात आलेल्या विविध स्पर्धाची माहिती दिली तसेच विभागीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय स्तरावर यश संपादन याबाबत माहिती दिली.
स्पंदन या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धाचे बक्षीस वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पार पडले.सूत्रसंचालन विनोद कदम यांनी केले तर आभार डॉ. विजय पवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षेत्तर कर्मचारी, विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page