पूर्णेत तालुकास्तरीय हैकाथॉन प्रशिक्षण संपन्न

Spread the love


पूर्णा(प्रतिनिधी)
येथील गट साधन केंद्र पूर्णा येथे तालुकास्तरीय Hackethon प्रशिक्षण संपन्न झाले.सदर प्रशिक्षणास अनिल जाधव अधिव्याख्याता डायट परभणी, बालाजी कापसीकर गटशिक्षणाधिकारी,श्री. टिमके सर (शिक्षण विस्तार अधिकारी)यांची प्रमुख उपस्थिती होती.
हनुमंते सर यांनी सदर उपक्रमांची पार्श्वभूमी,शिक्षकांची बदलती भूमिका व उपक्रमाचे महत्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
प्रशिक्षण सुलभक म्हणून श्री.हनुमंते सर व श्री.व्यंकटरमण जाधव सर, (विषय साधनव्यक्ती) यांनी सुलभन कार्य केले.तालुक्यातील 90-शिक्षकांनी या प्रशिक्षणास मोठ्या संख्येने सहभाग नोंदवीला.
कार्यशाळेत प्रत्यक्ष कृतियुक्त सहभागी प्रशिक्षणार्थ्यांनी एकूण १२ समस्यांचे सादरीकरण पोस्टर प्रेसेंटेशन करण्यात आले.ह्यात समस्या शोधून कशा पद्धतीने समस्यांवर उपाययोजना करता येतील याबद्दल सविस्तर माहिती प्रत्येक गटाने सादरीकरण केले.सदर प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी गट साधन केंद्रातील सर्व विषय साधनव्यक्ती यांनी परिश्रम घेतले.

You cannot copy content of this page