अवैध वाळू वाहतूकीवर भल्या पहाटे डिवाएसपी पथकाचा छापा

Spread the love

पूर्णेतील कानडखेड फाटा येथे वाळूचा टिप्पर जप्त;पोलीसांत चालक मालकांवर गुन्हा
पूर्णा/प्रतिनिधी
येथील पूर्णा नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून
त्याची वाहतूक करत असलेल्या ठिकाणी डिवाएसपी डॉ समाधान पाटील यांच्या पथकाने बुधवारी दि.१५ जानेवारी रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास छापेमारी केली.यावेळी पथकाने अवैध वाळूचा एक टिप्पर जप्त केला असुन पूर्णा पोलिस ठाण्यात सदरील टिप्पर चालक व मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पूर्णा तालुक्यात वाळूची अवैध वाहतूक होत असल्याने डॉ.समाधान पाटील यांनी वाळू वाहतूकी विरोधात कारवाई करण्यासाठी पथकं तैनात केली आहेत.अवैध वाळू वाहतूकीवर नजर ठेवून असलेल्या पथकातील पो.काॅ. पांडुरंग वाघ,पो.काॅ राठोड यांनी पूर्णा-ताडकळस रस्त्यावरील कानडखेड फाटा येथे बुधवारी सकाळी ५ वाजण्याच्या सुमारास छापा घालून वाळूने भरलेले टिप्पर क्र.एम.एच २४ /एफ/ ७२६२ सह चालकास ताब्यात घेतले.यावेळी त्यांचेकडे वाळू विक्रीचा परवाना नसल्याने त्यास ताब्यात घेऊन पूर्णा पोलिस ठाण्यात पोकाॅ.पांडूरंग वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार टिप्पर चालक अकाश गोडबोले मालक विष्णू जाधव यांच्या विरुद्ध ३०३(२) बिएन एस सह कलम ४८(७)(८) गौण खनिज कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पूर्णा पोलिस करत आहेत.

You cannot copy content of this page