महावितरणचा आउटसोर्सिंग कर्मचाऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

Spread the love


पूर्णा-झिरोफाटा रस्त्यावरील घटना;
पूर्णा(प्रतिनिधी)
महावितरण कंपनीच्या पूर्णा उपविभाग कार्यालया अंतर्गत येणाऱ्या ११ के.वी विद्युत वाहिनीच्या तारांवर आऊटसोर्सिंग कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या एका २६ वर्षीय तरुण कर्मचाऱ्यांचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना शहरा जवळील  पूर्णा-झिरो फाटा रस्त्यावर वैभव जिनींग समोरील खांबावर रविवारी दि.१९ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडल्याची उघडकीस आली आहे.
    विशाल सुदामराव जोगदंड वय २६ वर्ष रा.गौर ता.पूर्णा असं त्या मयत आउटसोर्सिंग कर्मचाऱ्याचे नांव आहे. सदरील कर्मचारी हा महावितरण कंपनीच्या पूर्णा उपविभागा अंतर्गत असलेल्या कार्यालयामध्ये मागील काही दिवसांपासून हेल्पर पदावर कार्यरत होता. रविवार दि.१९ जानेवारी रोजी नेहमीप्रमाणे तो ड्युटीवर आला होता. दरम्यान झिरोफाटा-पूर्णा रोडवर वैभव जिंनीग फॅक्टरी जवळ विद्युत वाहिनीत बिघाड झाल्यानंतर बिघाड दुरुस्त करण्यासाठी तो स्थानिककचे महावितरण कंपनीचे सहकारी लाईनमेन हे सायं ६ वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी गेले होते. संबंधित घटनास्थळावर रस्ता क्रॉस करून एक मोठे विद्युत रोहित आहे .यावर ११.के.वी तसेच L.T. लाईन देखील आहे. संबंधित वाहिन्यांवर काम करत असताना त्यास विजेचा जोरदार धक्का लागला. यातच तो वाहिन्यांवर चिकटून त्याचा जागीच दुर्दैवी अंत झाला.यावेळी वाहीन्यावर काम करत असताना नेमकी घटना कशी कसा काय,कशामुळे घडली.विजेचा धक्का कसा काय बसला हे मात्र नक्की समजू शकले नाही.घटना घडताच त्याचे सोबत असलेल्या सहका-यांनी घटनास्थळावरुन काढता पाय घेतला.घडल्याचे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या अनेकांनी पाहिले. घटनास्थळी बघ्यांच्या जमावाची एकच गर्दी उसळली होती. दरम्यान मयत विशाल जोगदंड यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले होते.यावेळी त्यांनी एकच आक्रोश केला.घटना घडल्यानंतर घटनास्थळी स्थानिक महावितरण कंपनीचे कोणीही वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित झाले नसल्याने संतप्त जमावाकडून रास्तारोको करण्याचा प्रयत्न केला. परंतु पूर्णा उपविभागाचे पोलीस अधिकारी डॉ. समाधान पाटील, पोलीस निरीक्षक विलास गोबाडे फौजदार पडलवार,पोकाॅ माळकर, पोकाॅ टाकरस, आदीं कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जमावाला शांत करण्यासाठी प्रयत्न केला. घटनास्थळी पोलिसांचे टीम दाखल झाली असून, विद्युत खांबावर मयत स्थितीत अडकलेल्या विशाल जोगदंड यांचा मृतदेह काढण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी अग्निशामक दलाला प्रचारण केले आहे . वृत्त लिहीपर्यंत याप्रकरणी कोणत्याही होण्याची नोंद करण्यात आली नसल्याचे समजते.

You cannot copy content of this page