परभणी;व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी गजानन देशमुख

Spread the love

परभणी(प्रतिनिधी)

५१ देशात सक्रिय असलेल्या व्हॉईस ऑफ मीडिया या संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी गजानन देशमुख यांची पुढील दोन वर्षासाठी  बिनविरोध  फेरनिवड करण्यात आली.व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी मंगळवार दिनांक 21 जानेवारी रोजी हॉटेल अतिथी येथे बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत सर्वानुमते गजानन देशमुख यांची पुढील दोन वर्षासाठी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी गजानन देशमुख यांच्या नावाचा प्रस्ताव कार्याध्यक्ष कैलास चव्हाण यांनी मांडला. त्याला सर्व कार्यकारणीने एकमताने मंजुरी दिली. त्यासोबत नऊ तालुक्याध्यक्ष यांनीही श्री.देशमुख यांना आपला पाठींबा दिला.
यावेळी प्रदेश संघटक विजय पाटील,मराठवाडा उपाध्यक्ष विशाल माने, मराठवाडा कार्यकारणी सदस्य प्रवीण चौधरी, ज्येष्ठ पत्रकार शिवाजी वाघमारे, दत्तात्रय कराळे, यांच्यासह कार्यकारणीतील श्रीकांत देशमुख,बाळासाहेब काळे, सय्यद युसुफ, शेख मुबारक,विजय कुलकर्णी, सुधीर बोर्डे, सुदर्शन चापके, मारुती जुंबडे,राजन मंगरूळकर, संतोष मगर, संतोष गवळी,मधुकर खंदारे,गणेश रेंगे, दिवाकर माने, शैलेश काटकर, दिलीप बोरुळ, योगेश गौतम, शंकर झटे, संजय घनसावंत, बालाजी कांबळे, सय्यद जमील, बाळासाहेब घिके, शेख माबुद उपस्थित होते.

You cannot copy content of this page