राष्ट्रीय मतदान दिनी पूर्णेत प्रभातफेरी, सामुहिक शपथ

Spread the love

निवडणुक विभागाचा पुढाकार; विजेत्यांचा गौरव

पूर्णा(प्रतिनिधी)
तालुक्यात पूर्णा निवडणूक विभागाच्या वतीने सर्व मतदान केंद्रावर १५ व्या राष्ट्रीय मतदार दिना निमित्त निबंध,वकृत्व,चित्रकला,निबंध स्पर्धेसह शहरात जनजागृती प्रभातफेरीसह,जनजागृतीपर सामुहिक शपथ आदीं विविध उपक्रम राबवित ता.२५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
पूर्णा शहरात राष्ट्रीय मतदान दिनाचे औचित्य साधून येथिल निवडणूक विभागाने दोन ते तीन दिवसांत शहरातील श्रोरी गुरुबुद्धी स्वामी महाविद्यालय, विद्याप्रसारणी शाळा,अभिनव विद्या विहार, आदीं ठिकाणी १ ते १२ इयत्ता मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निबंध,वकृत्व,चित्रकला,निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.ता.२५ रोजी पूर्णा शहरातील गट साधन केंद्र मैदानामध्ये विविध शाळेतील वि‌द्यार्थ्यांची रॅली एकत्रित झाली त्यावेळे मतदार दिना निमित्त पार पडलेल्या  विविध स्पर्धेतील स्पर्धकांना आणि उल्लेखणीय कार्य केलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सामुहिक प्रतिज्ञा घेण्यात आली. कार्तयक्रमास तहसीलदार,माधवराव बोथीकर, नायब तहसीलदार पंढरीनाथ शिंदे,गट शिक्षणाधिकारी बालाजी कापसीकर, निवडणुक विभाग प्रमुख व्यंकटेश जजरवार, आदींची प्रमुख उपस्थिती होती. त्यावेळी बालाजी कापशीकर यांनी मतदानाचे महत्व पटवून दिले व रॅलीत सहभागी झालेल्या वि‌द्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले. विविध शाळेने काढलेल्या रॅलीमध्ये विद्‌या प्रसारणी सभेची हायस्कूल, अभिवन विद्या विहिर, डॉ. आंबेडकर स्मारक हायस्कुल, जानेश्वर वि‌द्यालय, नेहरु इंग्लीश हायस्कूल, समता वि‌द्यालय, कस्तुरबा गांधी वि‌द्यालय यांनी प्रामुख्याने सह‌भागी झाले होते. त्यावेळी अभिनव वि‌द्यालयाचे एन.सी.सी. थे विद्‌यार्थी आणि गणेवशातील स्कॉट गाईडचे विद्यार्थ्यांनी संर्वाचे लक्ष वेधून घेतले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी व्यंकटेश जजरवार,अरविंद पंडीत,शिवा देवणे,व्यंकटरमण जाधव,ढाले सुर्यवंशी शेलाटे आदींनी परिश्रम घेतले.

You cannot copy content of this page