श्री वैद्यनाथ आय.टी.आय व फिनिक्स पब्लिक स्कूल,के.जी.जी स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात

Spread the love

परळी (प्रतिनिधी)
येथील दयाधर्म सामाजिक प्रतिष्ठान हाळम संचलित श्री वैद्यनाथ आय.टी.आय व फिनिक्स पब्लिक स्कूल, के.जी.जी स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माधव मुंडे सर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते माणिकराव दहिफळे,सेवानिवृत्त स्वतंत्र सैनिक बालाजी गुट्टे,सुधाकर अण्णा गित्ते, मंचकराव गुट्टे,वसंतराव दहिफळे,मधुकर दहिफळे,अरूनराव दहिफळे,बळीराम गित्ते,दयाराम गित्ते,सुधाकर दहिफळे,सुधाकर गुट्टे,सुभाष दहिफळे,भगवान पेंटूळे व गावातील ज्येष्ठ नागरिक तसेच पंचक्रोशीतील पालक वर्ग उपस्थित होता.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री वैद्यनाथ आय टी आय चे प्राचार्य सोमेश मुंडे सरांनी केले व अध्यक्ष म्हणून श्री.माधव मुंडे सरांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले.प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेच्या विद्यार्थ्यांनी भाषणे सादर केली व 26 जानेवारी निमित्त झालेल्या स्पर्धांचे बक्षीस वाटप झाले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आवाड मॅडम यांनी केले व उपस्थितांचे आभार सुमन सरवदे मॅडम यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वरी मॅडम,गोविंद दहिफळे सर,पिंपळे सर, करुणा मॅडम,कातकडे सर,वर्मा सर,आरती फड मॅडम,वैष्णवी मॅडम,प्रतीक्षा मॅडम,पंडित सर,वसंत होळंबे,हरीचंद मुंडे,अशोक मुंडे,शोभा मुंडे,सोनाली मुसळे ,स्कूल व आय टी आय कॉलेज च्या सर्व स्टाफ ने परिश्रम घेतले.

You cannot copy content of this page