एक संवाद विद्यार्थीनींशी;विद्यार्थीनींच्या सक्षमीकरणासाठी परभणी पोलीसांचा स्तुत्य उपक्रम
परभणी(प्रतिनिधी)
शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थीनींच्या सक्षमीकरणासाठी parbhani police परभणी जिल्हा पोलिस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी Suprtendand of Police RavindraSing Pardesi यांच्या कल्पनेतून पोलीस दलाच्या वतीने ‘एक संवाद विद्यार्थीनींशी’स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला असून, पोलीस दलातील अधिकारी दोन दिवसात जिल्हयातील १२ शाळा/महाविद्यालयामध्ये विद्यार्थीनींशी तज्ञ मार्गदर्शकां मार्फत साधणार संवाद
शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थीनींना Good Touch Bad Touch बहुल मार्गदर्शन होऊन विद्यार्थीनींना सक्षम करणे त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यांना सुरक्षीततेची जाणीव करुन देणे फसव्या प्रवृत्तीपासुन स्वतःला कसे सुरक्षीत ठेवता येईल या बद्दल त्यांचाशी अनुपचारीक चर्चा करणे या उद्देशाने मा. पोलीस अधीक्षक श्री. रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी यांच्या संकल्पनेतुन एक संयाद विद्यार्थीनींशी हा उपक्रम जिल्हा पोलीस दल राबवत असून सदर उपक्रमात विद्यार्थीनींना जानीव चारीटेबल ट्रस्टमुंचई येथील तज्ञ मार्गदर्शक वक्ते श्री. मिलींद पोंक्षे, व श्रीमती गौरी संखे हे मार्गदर्शन करीत आहेत.
आज दिनांक- २० रोजी परभणी शहरातील गांधी विदयालय, कन्या शाळा, पोदार शाळा, शिवाजी महाविदयालय व ज्ञानोपासाक महाविदयालय तसेच पालम शहरातील ममता विदयालय याठीकाणी शालेय व महाविदयालयातील विदयार्थीनी करीता मार्गदशन कार्यक्रम घेण्यात आले. सदर कार्यक्रमात विदयार्थीनींच्या सक्षमी करणासाठी मार्गदर्शन व प्रबोधन केले. त्यात विदयार्थीनींनी स्वतः समक्ष बनतांना समाजात सुरक्षित राहण्याचा मार्ग, चांगले व वाईट ओळखणे, विचार व संस्कार, स्पर्श, आकर्षन, प्रलोभन व व्यसन इ. विषयांवर महत्वाचे मार्गदशन केले. सदर मार्गदर्शन वर्गात विदयार्थीनींना तसेच उपस्थित शिक्षकांना पोलीसांनी काही समस्या व अडी-अडचणी उदभवल्यास डायल ११२ ला तसेच दामिनी/निर्भया पथकाला संपर्क करणे बाबत आवाहन सदर कार्यक्रमात शालेय व महाविद्यालयातील विद्यार्थीनींची तसेच अध्यापकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.