Parbhani Police दलातील १६५ अंमलदारांना पदोन्नती

Spread the love

२८ पोलीस अंमलदारांना पोलीस हवालदार ते सहाय्यक पोलीस उप निरीक्षक तसेच ३६ पोलीस अंमलदारांना पोलीस शिपाई/पोलीस नाईक ते पोलीस हवालदार पदावर पदोन्नती

परभणी(प्रतिनिधी)
जिल्हा पोलीस अधीक्षक, रविंद्रसिंह परदेशी यांनी परभणी जिल्हा पोलीस दलात आस्थापनेवर कार्यरत असणाऱ्या श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व पोलीस हवालदार अशा एकूण १६५ पोलीस अंमलदारांना सेवांतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेच्या तिसऱ्या लाभात एस-१० वरून एस-१४ मध्ये वेतन निश्चितीच्या लाभाची नूतन वर्षात भेट देण्यात आलेली आहे.
तसेच ७६ व्या गणतंत्र दिनाच्या निमित्त परभणी जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील २८ पोलीस अंमलदारांना पोलीस हवालदार ते सहाय्यक पोलीस उप निरीक्षक तसेच ३६ पोलीस अंमलदारांना पोलीस शिपाई/पोलीस नाईक ते पोलीस हवालदार पदावर पदोन्नती देण्यात आली.पदोन्नती झालेल्या सर्व पोलीस आंमलदरांचे श्री. रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी, पोलीस अधीक्षक, परभणी यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले. सदरचे कामकाज रविंद्रसिंह परदेशी, पोलीस अधीक्षक, परभणी यांचे मार्गदर्शनाखाली व यशवंत काळे, अप्पर पोलीस अधीक्षक परभणी, व. प्रेमप्रकाश माकोडे, प्र. पोलीस उप अधीक्षक गृह यांचे नेतृत्वात प्रमूख लिपीक नितीनकुमार मोरे, वरिष्ठ श्रेणी लिपीक विनोद जोगदंड, व पोलीस अंमलदार गजानन चव्हाण यांनी मिळून पार पाडले आहे.

You cannot copy content of this page