शासन अर्थसाहाय्य;वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी, मयतांच्या नातेवाईकांना पालकमंत्री मेघना साकोरे (बोर्डीकर)यांच्या हस्ते मदतीचे वाटप
परभणी(प्रतिनिधी)
वन विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यातील पूर्णा, परभणी,सेलू तालुक्यात वन्यप्राण्याच्या हल्यात जिवीत हानी व गंभीर जख्मी झलेल्या व्यक्तीस व त्यांच्या नातेवाईकास शुक्रवारी ता.३१ रोजी पालकमंत्री मेघना साकोरे (बोर्डीकर), जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते शासनाकडुन दिले जाणारे अर्थसहायक वाटप करण्यात आले.
परभणी जिल्ह्यातील निपाणी टाकळी ता. सेलु येथील कै. मोतीराम रंगनाथ गिराम यांचा रानडुकराच्या हल्यात दुर्दै मृत्यु झाला होता.त्यांचे वारसदार रामप्रसाद मोतीराम गिराम यांना रु. २५ लाख रुपये तर पूर्णा तालुक्यातील कात्नेश्वर येथील शेतकरी दिगंबर मारोती हेंडगे आणी परभणी तालुक्यातील पोरवड येथिल द्वारकाबाई दिंगाबर तिडके हे रानडुकराच्या हल्यात गंभीर जखमी झाले होते त्यांना प्रत्येकी ५ लाख रुपयांच्या अनुदानास पात्र ठरले आहेत.त्यांना मेघनाताई दिपक साकोरे-बोर्डीकर, पालकमंत्री परभणी जिल्हा यांचे हस्ते परभणी वन विभागातील सन २०२४-२५ मध्ये वन्य प्राण्याच्या हल्ल्यात मनुष्य गंभीर जख्मी व जीवीतहानी प्रकरणात शासनाकडुन अनुक्रमे गंभीर जख्मी व्यक्तीस रु.५.०० लक्ष व जिवीतहानी झालेल्य व्यक्तीच्या नातेवाईकास रु.२५.०० लक्ष शासनातर्फे नुकसान भरपाई चा धनादेश संबंधीतास देण्यात आले. सदर कार्यक्रमात मा. जिल्हाधिकारी श्री. रघुनाथ गावंडे, भा.प्र.से. डॉ. राजेंद्र नाळे विभागीय वन अधिकारी हिंगोली,. गंगाधर प्रकाशराव ढगे सहा.वनसंरक्षक, वन विभाग, परभणी आर.आर. चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी, परभणी प्रा. , अ रा आयनिले वनपाल आरागिरणी परभणी, के एम थोरे वनपाल विका परभणी , श्रीमती शेख निलोफर शेख सत्तार वनरक्षक परभणी उपस्थित होते.