अचंबीत;चोरट्यांनी चक्क विद्युत खांबावरील तार पळवली

Spread the love

पूर्णा तालुक्यातील गौर -आडगाव शिवारातील घटना;३ लाख रुपये किंमतीची १० क्विंटल तार चोरीला

पूर्णा(प्रतिनिधी)/२ फेब्रुवारी
एक्सप्रेस फिडरचा विद्युत पुरवठा करण्यासाठी खांबावर चढविण्यात आलेली सुमारे ३ लाख रुपये किंमतीची १० क्विंटल अॅल्युमिनियमची तार अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्याची अचंबीत करणारी घटना पूर्णा
तालूक्यातील गौर -आडगांव शेतशिवारात घडल्याचे ता.२फेब्रवारी रोजी उघडकीस आले असून, महावितरण कंपनीच्या पूर्णा उपविभागा अंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटदाराची तार चोरीला जाण्याची ही मागील पंधरवड्यातील दुसरी घटना असल्याने अल्युमिनियमची तार चोरणारी टोळी तर सक्रिय झाली नाही ना असा संशय आता व्यक्त केला जात आहे.

पूर्णा तालुक्यातील चुडावा-वसमत रस्त्यावरुन महावितरणच्या एका कंत्राटदाराच्या साहित्यासह लाखों रुपये किंमतीच्या विद्युत तारेची चोरी झाल्याची घटना मागील पंधरा दिवसांपूर्वी घडली होती.घटनेतील चोरट्यां विरुद्ध चुडावा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्यापही चुडावा पोलिसांना चोरट्यांचा थांगपत्ता लागला नाही.या घटनेस पंधरा दिवस लोटले असतानाच गौर-आडगांव शिवारातून चोरट्यांनी १० क्विंटल तार चोरुन नेल्याची घटना घडल्याचे उघडकीस आले आहे.याबाबत अधिक माहिती अशी की,महावितरण कंपनीच्या उपविभागाअंतर्गत प्रस्तावित समृद्धी महामार्ग रस्त्यावर बाजूला खांबाचे तसेच गौर-आडगांव शिवारातील एका स्टोन क्रेशरला विद्युत पुरवठा करण्यासाठी एक्सप्रेस फिगरचे काम नाशिक येथील अशोका बिल्डकाॅम या कंपनीला देण्यात आले आहे. पूर्णा उपविभागातून स्टोन क्रेशरला विद्युत पुरवठा करण्यासाठी एक्सप्रेस फिडर (११ के व्ही) लाईनचे सुमारे दोन ते अडीच किलोमीटर लांब विद्युत खांब रोवून त्यावर सुमारे ३ लाख रुपये किंमतीची १० क्विंटल अल्युमिनियमची तार नुकतीच बसवली होती.सदर विद्यूत खांबावरील जोडणी केलेल्या तारेतून विज वहन सोडणेच बाकी असताना ता.३१ जानेवारी रोजी रात्री उशिरा गौर-आडगाव शिवारातील विद्यूत पोलवरील तार अज्ञात चोरट्यांनी कट करुन चोरुन नेली असल्याचे उघडकीस आल्याने कंत्राटदाराने ता.१ फेब्रुवारी रोजी ,सदर घटनेची माहिती कंत्राटदाराने पोलिस ठाण्यात  दिल्यानंतर चुडावा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आहे.सदर वृत्त लिही पर्यंत याप्रकरणी कोणत्याही गुन्ह्याची नोंद झाली नसल्याचे समजते.

You cannot copy content of this page