पूर्णेत सोमवारी लिंगैक्य गंगाबाई एकलारे यांच्या समाधीवर ‘लिंग स्थापना विधी’
पूर्णा(प्रतिनिधी)
येथिल माजी नगराध्यक्ष लिंगैक्य.गंगाबाई एकलारे यांच्या समाधीवर’लिंग स्थापना’विधी कार्यक्रम हिमवत्केदार श्री श्री श्री १००८ जगद्गुरु भिमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे. यावेळी श्री ष.ब्र.प्र. १०८ डॉ. नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांची उपस्थिती राहणार आहे.सोमवारी ता.३ फेब्रुवारी रोजी नांदेड रोड येथील श्री बाबागुरु हंम्पय्या स्वामी शांती धाम येथे हा विधी संपन्न होणार आहे .या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन एकलारे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
पूर्णा येथिल जेष्ठ समाजसेवक,लिंगेक्य. सितारामअप्पा एकलारे यांच्या पत्नी पालीकेच्या मा.नगराध्यक्षा लिंगैक्य.श्रीमती गंगाबाई सिताराम अप्पा एकलारे यांचे गतवर्षी ६ आॅक्टोंबर २०२४ रोजी निधन झाले होते.लिंगायत धर्म परंपरे नुसार समाधीवर लिंग स्थापना विधी करण्यात येतो.मित्ती माघ शुध्द ६ सोमवार ता.३ फेब्रुवारी रोजी सकाळी नांदेड रोडवरील श्री बाबागुरु हंम्पय्या स्वामी शांती धाम येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील विधी कार्मक्रम हिमवत्केदार श्री श्री श्री १००८ जगद्गुरु भिमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते संपन्न होणार असून, या कार्यक्रमास प्रमुख उपस्थित म्हणून श्री ष.ब्र.प्र. १०८ डॉ. नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज हे उपस्थित राहणार आहेत..तरी दुपारी १ ते ५ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन समस्त एकलारे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.