संत रविदास महाराज जयंती उत्सवाच्या अध्यक्षपदी सुशिल गायकवाड
पूर्णेत जयंती सोहळ्याची नुतन कार्यकारणी जाहीर
पूर्णा(प्रतिनिधी )/४फेब्रुवारी
श्री संत गुरु रविदास महाराज सार्वजनिक जयंती उत्सव मंडळाच्या नुतन कार्यकारणीची नुकतीच निवड करण्यात आली असून,जयंती मंडळाच्या अध्यक्षपदी येथिल सामाजिक कार्यकर्ते सुशिल गायकवाड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी पूर्णा शहरात येथिल समाज बांधवांनी भव्य दिव्य स्वरुपात जयंती सोहळ्याचे आयोजन केले आहे.यानिमीत्त नुकतीच पालीचा सभागृहात समाज बांधवांची एक बैठक पार पडली. बैठकीस चर्मकार महासंघाचेतालुकाध्यक्ष अमोल गायकवाड, बबनराव अन्नपूर्णे, शिवाजीराव सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी लिंबाजी गायकवाड हे होते त्यावेळी समाज बांधवांच्या उपस्थितीत गुरु रविदास महाराज यांच्या ६४८ वी जयंती निमित्य जयंतीची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. जयंती मंडळाच्या अध्यक्षपदी सुशिल गायकवाड,तर सचिव संतोष जोगदंड यांच्या सह उपाध्यक्ष लक्ष्मण परसुते ,कार्याध्यक्ष सुशीलकुमार दळवी ,नामदेव पाटील ,सहसचिव अनिल नारायणकर, कोषाध्यक्ष अमोल गायकवाड, मुंजाजी असोरे , सहकोषध्यक्ष दीपक जोनवाल, संतोष आसोरे , सदस्यपदी रुपेश जोनवाल, बालाजी हिवरे ,बालाजी असोरे, हरी जोगदंड ,हरी असोरे, अनिल शिखरे, रवी हराळे, अजय गरडवाल ,सल्लागार डॉ.. नागनाथ झुंजारे डॉ.गंगासागरे यांची मार्गदर्शक म्हणून निवड करण्यात आली आहे .या वेळी लिंबाजीराव गायकवाड, शिवाजीराव सोनटक्के विजय सोनटक्के , वैजनाथ नारायणकर ,राजू नारायणकर , पुरभाजी आसोरे ,सुभाष सूर्यवंशी, डॉ. शुभम गंगासागरे, प्रकाश खरात ,पवन असोरे ,गजानन सूर्यवंशी, बाबुराव कसारे, ज्ञानोबा असोरे, विकास गायकवाड सह राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पदाधिकारी चर्मकार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.