श्री संतसेना महाराज मंदिरात मुर्तींची प्राणप्रतिष्ठापना

Spread the love

पूर्णेत दोन दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन

पूर्णा(प्रतिनिधी):
येथील नाभिक समाज बांधवांच्या पुढाकाराने बोर्डीकर प्लॉटिंग परिसरातील श्रीसंतसेना महाराज मंदिरात श्री.विठ्ठल- रुक्मिणी व श्रीसंतसेना महाराज यांच्या मुर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन गुरुवार व शुक्रवार ता.६ व ७ फेब्रुवारी रोजी करण्यात आले असून दोन दिवस धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार असल्याची माहिती नाभिक समाजाच्या वतीने रंगनाथ सुर्भयवंशी , मारोतराव भोसले, रावसाहेब मानवते यांनी दिली आहे.
पूर्णा येथे आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात परभणीचे माजी उपमहापौर भगवानराव वाघमारे यांच्या हस्ते होमहवन, अभिषेक, विधीवत पूजा व मुर्ती स्थापना करण्यात येणार आहे.यावेळी ह.भ.प नारायण महाराज पांचाळ टाकळीकर यांचे हरिकिर्तन होणार आहे.तत्पूर्वी ता. ६ गुरुवारी सकाळी ९ वाजता महादेव मंदिर ते श्री.संतसेना महाराज मंदिरा पर्यंत श्रींच्या मुर्तीची मिरवणूक काढण्यात येवून नंतर विधीवत पूजा करण्यात येईल.शुक्रवारी मुर्ती प्राणप्रतिष्ठापना नंतर दुपारी दोन ते पाच या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तरी शहर व ग्रामीण भागातील भक्तांनी या कार्यक्रमाचा मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन नाभिक महामंडळ जिल्हा शाखा परभणी व पूर्णा तालुका शाखेचे पदाधिकारी,कार्यक्रमाचे आयोजक नाभिक समाज बांधवांनी केले आहे.

You cannot copy content of this page