धक्कादायक; शेतातील झाडाला २३ वर्षीय तरुणाने लावला गळफास
पूर्णेच्या ताडकळस पोलिस हद्दीतील घटना;मृत्युचे कारण अस्पष्ट
ताडकळस(प्रतिनिधी)
पूर्णा तालुक्यातील ताडकळस पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ताडलिमला येथे एका २३ वर्षीय तरुणाने शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवार ता.४ फेब्रुवारी रोजी घडल्याचे उघडकीस आले आहे.परंतु त्याने आत्महत्या का केली याचे कारण मात्र समजू शकले नाही.
सुभाष निवृत्ती नावळे वय २३ वर्ष रा.ताडलिमला ता.जि.परभणी असं त्या गळफास लावून आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास त्याने शेतात असतानाच शेतातील करंजीच्या झाडाला गळफास लावला.त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला.घटना परिसरातील शेतकऱ्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी ताडकळस पोलीसांना ही माहिती दिली.घटनास्थळी ताडकळस पोलिस ठाण्याचे कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केला आहे.परंतु त्याने नेमका कशामुळे गळफास लावला हे मात्र नक्की समजू शकलं नाही.
याप्रकरणी ताडकळस पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.