पूर्णेत रमाईबाई आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवाचे आयोजन

Spread the love

एक दिवशीय विपस्सना शिबीर
पूर्णा(प्रतिनिधी)
येथील बी.आर.आंबेडकर स्मारक समीती व बौद्ध विहार पूर्णाच्या वतीने शुक्रवार दि.०७ फेब्रुवारी, रोजी सकाळी १०:३० वाजता. बुध्दविहार, येथे त्यागमुर्ती रमाई भिमराव आंबेडकर यांची १२७ वी जयंती साजरी करण्यात येणार आहे.या निमित्ताने एक दिवसीय विपश्यना शिबीर आयोजित केले आहे.या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भंते पय्यावंश यांनी केले आहे.
पूर्णा शहरात प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी गुरुवारी रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, सकाळी १०:३० वा. बुध्द विहारात वंदना पुजा विधी संपन्न होईल.एक दिवसाचे विपस्सना शिबीर आयोजीत करण्यात आलेले आहे. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून भदन्त डॉ. उपगुप्त महाथेरो उपस्थित राहणार आहेत. यावेळी थबरवा मेडिटेशन सेंटरचे भदन्त डॉ. अशीन उत्तमतारा सयाडी हे धम्मदेसना देणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. काशीबाई रामभाऊ कांबळे प्रमुख अतिथी म्हणून मा. भिमराव वायवळ (संचालक, सारनाथ सोशल वेलफेअर फाऊंडेशन, परभणी)मा. डॉ. संग्राम जोंधळे(बालरोग तज्ञ, नांदेड)प्रमुख वक्त्या मा. डॉ. करूणा जमधाडे (नादेड) यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती भिक्खू पय्यावंश (बुध्द विहार, पूर्णा.) यांनी दिली आहे.या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.

You cannot copy content of this page