खळबळजनक;बंद खोलीत आढळला पालीका कर्मचाऱ्याचा मृतदेह

Spread the love

पूर्णा शहरातील अशोक नगरातील घटना; परिसरात दुर्गंधी पसरल्याने उघडकीस आला प्रकार;घटनेने खळबळ; चर्चेला उधाण

पूर्णा(प्रतिनिधी)
पालिकेच्या सफाई विभागात काम करणाऱ्या एका ३६ वर्षीय कर्मचाऱ्याचा त्याच्या राहत्या घरी एका बंद खोलीत मृतदेह आढळून आल्याची घटना घडली आहे. परिसरात दुर्गंधी येत असल्याने सदरील प्रकार शनिवार तारीख ८ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आला.घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.
नागसेन केरबा गायकवाड वय ३६ वर्ष रा.अशोक रोड ता. पुर्णा जि. परभणी असो त्या मयत कर्मचाऱ्यांचे नाव आहे. पूर्णा पालिकेत सफाई विभागात मागील दहा वर्षांपासून गायकवाड हे नगरपालिकेत रूजू होते. शनिवार ता.८रोजी सकाळच्या सुमारास अशोक नगर भागातील मयत गायकवाड यांच्या घराजवळील नागरिकांना दुर्गंधी येत असल्याने नागरिकांनी घटनेची माहिती पूर्णा पोलिसांना दिली. माहिती मिळताच पूर्णा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास गोबाडे ,सपोनी सोमेश्वर शिंदे ,जमादार बंडू राठोड आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पहाणी केली असता मयत गायकवाड यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.घरात यावेळी कोणी नसल्याने व घरातील दरवाजांना आतून कडी कुलूप लावलेली असल्यामुळे पोलिसांनी तातडीने मयताचे नातेवाईकांशी संपर्क साधून त्याची बहीण व भाऊ यास घटनास्थळी बोलावून घेतले. पोलिसांनी बंद दरवाजा तोडून आज प्रवेश केला असता पालिका कर्मचारी नागसेन गायकवाड यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला.पोलीसांनी गायकवाड याचा मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करत उत्तरीय तपासणीसाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला आहे. घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.घटनास्थळी दाखल असलेल्या पोलिसांशी संवाद साधला असता सदरील कर्मचाऱ्यांचा मृत्यू हा नेमका कशामुळे झाला हे उत्तरीय तपासणीनंतर समजेल असे सांगितले. पूर्णा पोलिसांनी घटनेची नोंद केली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

You cannot copy content of this page