स्था.गु.शाखेकडून ऑल्युमिनियम तार चोर टोळीचा पर्दाफास

Spread the love

परभणी,दि.08(प्रतिनिधी) : संपूर्ण जिल्ह्यात तार चोरीच्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या एका पथकाने अ‍ॅल्युमिनियम व कॉपर तारेची चोरी करणारी टोळीचा पर्दाफास केला आहे.
या विभागाच्या पथकास खात्रीशीर मिळालेल्या माहितीप्रमाणे लक्ष्मण भागोजी पवार (रा.गव्हा) व जय भगवान काळे (रा. सिंगणापूर फाटा) या दोघांना ताब्यात घेतले. तेव्हा ते दोघे व अन्य साथीदार यांनी सेलू तालुक्यातील निपाणी टाकळी ते करडगाव तसेच चुडावा ,पूर्णा पोलिस ठाण्याचे हद्दीतील तसेच जिल्ह्याच्या अन्य भागात लाईटच्या पोलवरील अ‍ॅल्युमिनिअमच्या तारेची मोठ्या प्रमाणावर चोरी केल्याची माहिती हाती आली. पथकाने या सर्वांना विश्‍वासात घेवून विचारपूस केली असता मागील एका वर्षात या टोळीने अनेक चोर्‍या केल्याच्या बाबी निदर्शनास आल्या. पथकाने या टोळीकडून दोन वाहने जप्त केली व एकूण 13 लाख 80 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अ‍ॅल्युमिनियमची तार काद्राबाद प्लॉट भागातील सय्यद कलिमोद्दीन सय्यद जैनूलाबद्दीन या व्यापार्‍यास विकल्याची माहिती आरोपींनी दिल्यानंतर पथकाने त्यासंबंधी तपास सुरु केला.
परभणी जिल्ह्यात गंगाखेड, सेलू, दैठणा, ताडकळस व परभणी ग्रामीण भागात आठ ठिकाणी गुन्हे केल्याची बाबही निदर्शनास आली. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात या टोळीची कसून तपासणी सुरु केली आहे.

You cannot copy content of this page