आयशर -दुचाकीच्या अपघातातील जखमी पैकी एकाचा मृत्य

Spread the love

पूर्णा-नांदेड रस्त्यावरील चुडावा गावाजवळ झाला होता अपघात; मयत माखणी येथील रहिवासी

पुर्णा /प्रतिनिधी
पूर्णा-नांदेड रस्त्यावरील चुडावा गावाजवळ रविवारी सायं सुमारास घडलेल्या अपघातातील दुचाकी वरील दोघां जखमींपैकी एका गंभीर जखमी माखणी येथील रहिवाशी असलेल्या शिवाजी शंकर गाडे नामक इसमाचा नांदेड येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची उघडकीस आले आहे.
     नांदेडकडे भरधाव वेगाने निघालेल्या एका एम.एच.१२/टी/१८३५ क्रमांकाच्या आयशर ट्रकने चुडावा गावाजवळ एम.एच.२२/एक्यु/७७०८ या  दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना पूर्णा-नांदेड महामार्ग क्र.६१ वरील चुडावा गावाजवळील सावली धाब्याजवळ रविवारी ता.९ रोजी सायं ५ वाजण्याच्या सुमारास घडली होती.घटनेत पूर्णा तालुक्यातील माखणी येथील रहिवाशी असलेले शिवाजी शंकर गाडे वय ५० वर्ष तसेच राम नेमाजी गाडे वय ४५ वर्ष हे नांदेड येथून लग्न समारंभ करून दोघे माखणी गावाकडे जात असताना त्यांच्या दुचाकीला आयशर ट्रकने उडवले.घटनेत शिवाजी शंकर गाडे सह राम गाडे हे गंभीर जखमी झाले होते.दरम्यान त्यांना उपचारासाठी नांदेड येथील विष्णुपुरी येथील रुग्णालयात हलविण्यात आले होते.शिवाजी शंकर गाडे यांच्या डोक्यास जबर मार लागल्याने अधिकचा रक्त स्राव होऊन त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचे समजते.तर राम गाडे यांच्या वर उपचार सुरू असल्याचे समजते.सोमवारी दुपारच्या समयी त्यांच्या पार्थिवावर माखणी गावात अंतिम संस्कार करण्यात आले.

————————————–

पूर्णा नांदेड महामार्ग रस्ता क्रमांक ६१ वर नगर पुणे, मुंबई कडे ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या लक्षणीय झाली आहे.रस्तावर महामार्ग पोलिस,आरटीओ यांनी साफ दुर्लक्ष केले आहे.अनेक जणं विना हेल्मेट,दुचाकी चालवत आहेत तर चारचाकी वाहनांची वेग मर्यादा अनियंत्रित झाली आहे.त्यामुळे अपघाताची मालीकाच या रस्त्यावर सुरू आहे.मागील दोन ते तीन वर्षांत नांदेड ते सिंगणापूर दरम्यान १०० एक जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे तर शेकडो वाहनधारकांना कायमचे अपंगत्व आले आहे.तर सा.बां विभागाने जागोजागी गती अवरोधक तसेच दिशा दर्शक फलक लावावेत तसेच आरटीओ आणी महामार्ग पोलिसांनी अपघात रोखण्यासाठी उपाययोजना राबविल्या पाहिजेत असे मत जाणकार व्यक्त करत आहेत.
      

You cannot copy content of this page