ज्येष्ठ समाजसेवक डॉ. दत्तात्रेय वाघमारे यांच्या सेवाकार्याचा गौरवार्थ ‘ सेवा समर्पण सोहळा

Spread the love

पूर्णा (प्रतिनिधी)
येथील ज्येष्ठ समाजसेवक डॉ. दत्तात्रेय रामचंद्र वाघमारे यांच्या सेवाकार्याचा गौरवार्थ ‘ सेवा समर्पण सन्मान समारंभाचे ‘ विद्या प्रसारिणी सभा या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.
विद्या प्रसारणी शाळेच्या प्रांगणात बुधवारी (ता. १२) सेवा समर्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. दत्तात्रेय वाघमारे यांचे आरोग्य, शैक्षणिक, कृषी व समाजकार्य क्षेत्रामध्ये मोठे योगदान आहे. आयुष्यात त्यांनी ६८ वर्ष अविरत अथक सेवा बजावली. त्यांचे अपार कष्ट, दिशादर्शक कार्य व निरपेक्ष सेवेचा सन्मान व्हावा या दृष्टिकोनातून त्यांच्या सेवा समर्पण सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या सेवाकार्याची दखल दै. सकाळ ने घेत त्यांना यापूर्वी २०२३ मधे सन्मानित केले होते. डॉ. विनय वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असलेल्या या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेड उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील शिक्षणप्रेमी व सामाजिक क्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या समारंभास उपस्थित रहावे असे आवाहन विद्याप्रसारणी सभेच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी डॉ. दत्तात्रेय वाघमारे यांची यावेळी ग्रंथतुला करण्यात येणार असून सदरील ग्रंथ शालेय विद्यार्थ्यांना वाचनासाठी देण्यात येणार आहेत. अशी माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे.

You cannot copy content of this page