पूर्णेत रविवारी रमाबाई आंबेडकर जयंती सोहळा;प्रतिमेची भव्य मिरवणूक
पूर्णा(प्रतिनिधी )
भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने पूर्णा शहरात रविवारी दि १६ फेब्रुवारी रविवारी रमाई आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे . या निमिताने स. ११ः३०वा डॉ आंबेडकर सांस्कृतिक भवन डॉ आंबेडकर नगर येथुन रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येणार असल्याची माहिती आहे.
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शहरात रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले असून, जयंती निमित्त शहरात त्यांच्या प्रतिमेची वाघवृंद लेझीम पथका सह सिद्धार्थ नगर, रेल्वे कॉलनी, विजय नगर ,भिमनगर खुरेशी मोहल्ला, किंग कॉर्नर ,शिवाजी पुतळा, बसवेश्वर चौक मार्गे डॉ.आंबेडकर चौक येथे दुपारी १:३० वा धम्मसभेत रूपांतर होईल या धम्मसभेच्या अध्यक्ष स्थानी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष तुकाराम ढगे, प्रमुख धम्मदेशना भदंत डॉ उपगुप्त महाथेरो, भदंत पी धम्मानंद , भन्ते पंयावंश तर मुखवक्ते म्हणून नांदेड येथील भारतीय बौद्ध महासभेच्या नांदेडच्या सरचिटणीस ॲड. चित्रलेखा कांबळे, प्रमुख पाहुणे म्हणून बाबा साहेब धबाले , अशोक कांबळे ‘ एम.एम भरणे , आनंदा भेरते, व्हीव्ही वाघमारे, विश्वनाथ झोडपे , आदीं मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या निमिताने सकाळी १० वा डॉ आंबेडकर चौक येथे शाहीर प्रकाश जोंधळे आणि संचाचा प्रबोधन गीतांचा कार्यक्रम होणार आहे तेव्हा या जयंती सोहळ्यास जास्तीत नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन भारतीय बौद्ध महासभा दक्षिण परभणी जिल्हा शाखा समता सैनिक दल पूर्णा शहरातील महिला मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे