वेळेनुसार शिक्षक म्हणून स्वतःमध्ये बदल करणे आवश्यक-बालाजी कापसीकर
पूर्णा;शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाचा पहिला टप्प्याचा समारोप
पूर्णा(प्रतिनिधी)
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने संपूर्ण राज्यभरात इयत्ता पहिली ते बारावी वर्गांना शिकवणाऱ्या शासकीय आणि खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षकांचे शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण सुरू आहे. या प्रशिक्षणाचा पहिला टप्पा ता.१०फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी या ५ दिवसीय कालावधीत पूर्णा शहरातील अभिनव विद्या विहार प्रशालेत संपन्न झाला. प्रशिक्षणा दरम्यान जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था डायट परभणीतील अधिव्याख्याता अनिल जाधव यांनी भेट देऊन प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले.समारोप प्रसंगी बोलताना पूर्णा तालुका गटशिक्षणाधिकारी बालाजी कापशीकर म्हणाले की, राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० च्या अंमलबजावणी करण्यासाठी,सर्व स्तरावरील शिक्षकांची क्षमता बांधणी करून शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिंगत करण्याचा प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे. बदलत्या काळानुसार शिक्षकांनी स्वतःमध्ये बदल करावा. यावेळी केंद्रप्रमुख सुंदर धवन, श्यामसुंदर मोकमोड, तानाजी बिराजदार यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रशिक्षणार्थींनी आपले मनोगत व्यक्त करून समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुंदर धवन तर सूत्रसंचालन व्ही. टी.जाधव तर आभार अनंत थडवे यांनी मांडले. प्रशिक्षण यशस्वीपणे संपन्न होण्यासाठी प्रशिक्षण प्रमुख श्री रवींद्र हनुमंते यांनी जबाबदारी सांभाळली तर सुलभक म्हणून व्यंकटरमण जाधव, अनिल ढाले, डॉ.अमोल देशपांडे, डॉ. संतोष सेलुकर, संतोष रत्नपारखे, आनंद जाधव, मारुती कदम, राजू पांचाळ, रामदास पांचाळ, विलास बोकारे, शिवाजी कातकडे श्रीमती सारिका गिरी, प्रतिमा मसारे, राधा भिसे, डॉलेश्वरी डिब्बे, समिता महाजन, मानोलीकर मॅडम आदींनी काम पाहिले.