२५ वर्षीय तरुणाने शेतात गळफास लावून केली आत्महत्या
पूर्णा तालुक्यातील महागांव येथिल घटना;ताडकळस पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद
पूर्णा/ताडकळस(प्रतिनिधी)
गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या तालुक्यातील महागांव येथील एका २५ वर्षीय युवकाने शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवार ता. १५ फेब्रुवारी रोजी घडल्याचे उघडकीस आले असून,मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.घटनेप्रकरणी ताडकळस पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गोविंद मारोतराव रोडगे रा.महागांव ता.पूर्णा जि.परभणी (वय २५ वर्ष) असं त्या मयत तरुणाचे नांव आहे. शनिवारी सकाळी महागाव शिवारातील महादु गंगाराम रोडगे यांच्या शेत गट नं. २२० मध्ये गोविंद रोडगे हा तरुण बाभळीच्या झाडाला गळफास लावून मृत्यू पावलेल्या अवस्थेत आढळून आला.या घटनेची माहिती मिळताच ताडकळस पोलिस ठाण्याचे सपोनि.गजानन मोरे, फौजदार गजानन काठेवाडे, बीट जमादार नागनाथ पोते आदींनी घटनास्थळी धाव घेऊन रितसर पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
गोविंद रोडगे याने आत्महत्या कोणत्या कारणाने केली हे मात्र नक्की समजू शकले नाही.याप्रकरणी ताडकळस पोलिस ठाण्यात बालाजी गंगाधर रोडगे यांच्या खबरीवरुन आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.तपास ताडकळस पोलिस करत आहेत