पूर्णेत पत्रकार भवनात शिवजयंती साजरी
पूर्णा(प्रतिनिधी)
येथील पत्रकार भवन येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे तालुकाध्यक्ष मुजिब कुरेशी होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार विजय बगाटे, अमृत कर्हाळे, सतीश टाकळकर, गजानन हिवरे, दौलत भोसले, अनिस बाबूमिया, नागेश नागठाणे, मो अलीम, श्रीहरी घुले, शेख अफसर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक जगदीश जोगदंड यांनी केले. सूत्रसंचालन प्रदीप कदम यांनी केले. आभार शहराध्यक्ष मोहन लोखंडे यांनी मानले.