पूर्णेत शिवजन्मोत्सवाचा उस्ताह;ढोल ताशांचे पथकशिवछत्रपतींच्या घोषणेने शहर दुमदुमले
पुर्णा[ प्रतिनिधी]
कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवा निमित्ताने शहरात शिवकालीन अश्वारूढ घोड्यावर शिवप्रभुंची,मावळ्यांची प्रतिकृती तसेच बैलगाडांचे पथक ढोल ताशे,लेझिम बँड पथकाचा समावेशासह रथातून शिवप्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली.यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणांचा नाद निनादला होता.
पूर्णा येथे जाणता राजा, स्वराज्य संस्थांपक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंती महोत्सवाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते.महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला शहरात मंगळवारी १८ रोजी रात्री पुणे येथील शिवचरित्रकार ह.भ.प.सुरेश महाराज नाईकवाडे यांचं किर्तन पार पडले.तर मध्यरात्री १२ वाजता शिवजन्माचा पाळणा कार्यक्रम पार पडला.दरम्यान शिवाजी महाराज चौकात शिवप्रेमींनी आकर्षक रोषणाई तसेच भव्य आतीषबाजी केली. सकाळपासूनच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी शहरातील शिवभक्तांनी गर्दी केली होती.११ वाजण्याच्या सुमारास महादेव मंदिर परिसरात शिवप्रतिमेचे पुजन मा. नगराध्यक्ष उत्तमरावजी कदम यांच्या हस्ते पार पडले. यावेळी शहरातील राजकीय, सामाजिक क्षेत्रासह व्यापारी, डॉक्टर , वकील, पत्रकार मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.शहरातील महादेव मंदिर येथून शांततेत वाजत गाजत निघालेली मिरवणूक श्री.गुरुबुद्धी स्वामी मठ संस्थान,संत नरहरी महाराज ,छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा बसवेश्वर चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात शिवजयंती महोत्सवाच्या वतीने महापुरुषांच्या प्रतिमेत पुष्प अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला.यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ समाधान पाटील यांच्या मार्गदर्शना खाली पो.नि.विलास गोबाडे व सहकारी पोलिस प्रशासनाने शहरात चोख बंदोबस्त ठेवला होता.जयंती महोत्सवाच्या वतीने अध्यक्ष कौस्तुभ कदम व सहका-यांनी आभार मानले.












