कै.गणपतराव गुट्टे विद्यालय व फिनिक्स पब्लिक स्कूल येथे शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा…!!
परळी/ प्रतिनिधी
कै.गणपतराव गुट्टे प्राथमिक व माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व फिनिक्स पब्लिक स्कूल मध्ये शिवजन्मोत्सव उत्सवात साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री माधव मुंडे सर व संस्थेच्या मार्गदर्शक ज्ञानेश्वरी फड मॅडम यावेळी उपस्थित होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे मुख्याध्यापक नवलकुमार वर्मा सर तसेच श्री वैधनाथ आय टी आय चे प्राचार्य सोमेश मुंडे सर यावेळी उपस्थित होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष माधव मुंडे सर यांनी खूप छान रित्या विद्यार्थ्यांना शिवरायांन बद्धल माहिती सांगत मार्गदर्शन केले . या वेळी विद्यार्थ्यांनी देखील उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दाखवत शिवरायांचे जीवनचरित्र या वर भाषण करत आपला सहभाग नोंदवला तसेच शिक्षकांनी या वेळी आपले शिवरायांनवर आपले मनोगत व्यक्त करत कार्यक्रमाची शोभा वाढवली या कार्यक्रमाप्रसंगी पालकांनी देखील आपली उपस्थिती दाखवत कार्यक्रमाचा आनंद घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चव्हाण मॅडम यांनी केले व आभार प्रदर्शन वैष्णवी मॅडम यांनी मानले यावेळी सर्व स्टाफ हजर होता