रेल्वेच्या लोकोपायलट संघात कडून ३६ तासांचे उपवास आंदोलन
देशव्यापी आंदोलनात पूर्णेतील चालक संघ सहभागी
पूर्णा (प्रतिनिधी)
भारतीय रेल्वेच्या लोको पायलट संघटनेच्या वतीने पूर्णा येथील रेल्वे चालकांनी आपल्या विविध मागण्यां, तक्रार निवारणासाठी ३६ तासांचे उपवास आंदोलन करत निवेदन दिले.
भारतीय रेल्वेच्या संपूर्ण लोको पायलट्सनी लोको पायलटनी आज त्या.२० व २१ फेब्रुवारी रोजी देशभर ३६ तास उपवास करून आपल्या कामाचे तास कमी करण्यासाठी तसेच साप्ताहिक सुट्टी बाबत आदीं मागण्या, तक्रारींचे निराकरण करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाच्या सापत्न वागणुकीचा निषेध करत आंदोलन केले.या देशव्यापी आंदोलनात पूर्णा येथील रेल्वे लोको पायलट संघ देखील सहभागी झाला होता.
गुरुवारी सकाळपासून, शुक्रवारी रात्री ८ वाजेपर्यंत ३६ तास उपवास करण्यास सुरुवात केली आहे.त्यांनी आपल्या प्रमुख मागण्या निवेदनाद्वारे रेल्वे प्रशासनास दिल्या आहेत.निवेदनावर सुरेंद्र बैस ठाकूर,मिथीलेश कुमार, प्रमोद कुमार, पंकज कुमार,आर.जी.मीना, राकेश कुमार,अनंत कुमार,रुपेश मेश्राम, सिद्धार्थ गोसावी,कगाणा संग्राम,अनंत कुमार राकेश कुमार, कंचन मोहन राज वर्मा आकाश गोंडवणे, कृष्णा मोहन मुकेश प्रसाद, हेमंत कुमार सोनी शिव बच्चन कुमार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
(पूर्णा -प्रतिनीधी गजानन हिवरे)