श्री गुरुबुद्धी स्वामी महाविद्यालयाच्या अमिश आठवलेची सुवर्णझेप

Spread the love

अंतर राज्य क्रीडा महोत्सव स्पर्धा चंद्रपूर; टेबल टेनिस स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी

पूर्णा(प्रतिनिधी)

अंतर राज्य क्रीडा महोत्सव स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या अंतर्गत चंद्रपूर येथे पार पडलेल्या आंतरराज्य क्रीडा महोत्सव स्पर्धेत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड च्या टेबल टेनिस संघाने प्रथमच स्वर्ण पदक पटकावले आहे. या स्पर्धेत श्री गुरु बुद्धीस्वामी महाविद्यालय पूर्णा चा विद्यार्थी अमिश आनंद आठवले याच्या नेतृत्वात टेबल टेनिस स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. या स्पर्धेत अमिश आठवले यांनी नेत्र दीपक कामगिरी करून आपल्या संघाला सुवर्णपदक मिळून दिले आहे. त्याला या स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. मुंबई पुणे व कोल्हापूर विद्यापीठ या संघावर मात करून स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड च्या संघाने टेबल टेनिस प्रकारात प्रथमच स्वर्ण पदक पटकावलेल्या आहे. अमिष आठवले यांना मोलाचे मार्गदर्शन प्रा बरकुंटे एस.आर यांचे लाभले. त्याच्या या नेत्र दीपक कामगिरीबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष श्री प्रमोद एकलारे, सचिव श्री अमृतराज कदम, सहसचिव श्री गोविंदराव कदम, प्राचार्य डॉ के राजकुमार, उप प्राचार्य डॉ शिवसांब कापसे, उप प्राचार्य डॉ गजानन कुरुंदकर, डॉ बर्डे आर.डी, पर्यवेक्षक श्री मिटकरी यु पी, उप प्राचार्य खराटे सर व सर्व प्राध्यापकांनी त्याचे अभिनंदन केले आहे.💐💐💐💐

You cannot copy content of this page