रेल्वे खाली सापडून २५ वर्षीय तरुण ठार

Spread the love

पूर्णा शहरातील विजयनगर भागातील घटना;लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद.

पूर्णा(प्रतिनिधी)

येथिल रेल्वे स्टेशन यार्डापासून जवळ असलेल्या विजयनगर परिसरातून परभणी कडे जाणा-या लोहमार्गावर धावत्या रेल्वेखाली सापडून एक २५ वर्षीय तरुण जागीच ठार झाल्याची घटना रविवारी २३ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे.याप्रकरणी पूर्णा लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अमित दिनेश लाठे रा.भिमनगर पुर्णा (वय २५) वर्ष असं त्या मयत तरुणाचे नाव आहे.रविवारी पहाटेच्या सुमारास विजयनगर भागातील नागरिकांना परभणीकडे जाणा-या रेल्वे रुळावरील हाय व्होल्टेज इलेक्ट्रीकल पोल क्र. ३१८/१६ जवळ कोणीतरी एक तरुण दोन तुकडे झालेल्या रक्तबंबाळ मयत अवस्थेत पडलेला असल्याचे निदर्शनास येताच.घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी जमली.यातील काही जागरुक नागरिकांनी स्थानिक रेल्वे लोहमार्ग पोलीसांना घटनेची माहिती कळवली. माहिती मिळताच सपोनि.हनुमंत पांचाळ, पोहेकाॅ.सचिन निकाळजे,पोकाॅ.अविनाश डावरे, होमगार्ड प्रकाश वाघमारे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला.पोलीसांनी सदर तरुणाची ओळख पटवत तो शहरातील भिमनगर भागातील अमित दिनेश लाठे असल्याचे निष्पन्न केले.पोलीसांनी त्याच्या नातेवाईकांना घटनास्थळी बोलावून घेत त्याची पुष्टी केली.यानंतर घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह येथिल ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.घटनेचा पुढील तपास लोहमार्ग पोलीस सपोउपनि नेगी हे करत आहेत.

मयत तरुण अमीत हा पहाटे रेल्वे रुळावरून जात असताना तो कोणत्या तरी धावत्या रेल्वेच्या खाली सापडला असावा त्याचा कोणत्यातरी अज्ञात रेल्वेच्या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला असावा अशी चर्चा शहरात ऐकायला मिळत होती.

You cannot copy content of this page