गोदावरी-पूर्णा संगमावर महाशिवरात्रीला कोटेश्वर महादेवाची यात्रा

Spread the love

पूर्णा(प्रतिनिधी)

येथून जवळच असलेल्या गोदावरी-पूर्णा नद्यांच्या संगमावर पुरातण कोटेश्वर महादेवाचं मंदिर असून दरवर्षी प्रमाणे महाशिवरात्रीला कोटेश्वर महादेवाची यात्रा भरणार असुन,रुद्राभिषेक बिल्वार्चन आरती ,सामुहिक शिवलिलामृत पारायणकिर्तन आदीं धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने यात्रेसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे.

     महाशिवरात्र माघ कृ. १३ बुधवार ता.२६ फेब्रुवारी रोजी तालुक्यातील मौजे कंठेश्वर येथिल श्री कोटेश्वर महादेव यात्रा महोत्सव आयोजित करण्यात आला असून, २६ फेब्रुवारी रोजी पहाटे ५ वाजता रुद्राभिषेक बिल्वार्चन आरती अभिषेक, सकाळी ८वाजता सामुहिक शिवलिलामृत पारायण, दुपारी १२ वाजता ह.भ.प. सोपान महाराज आहेरवाडीकर यांचे किर्तन यानंतर उपस्थित भाविकांंना महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे.सायं.५ वाजता दिप दान सोहळा आरतीरात्री ८ ते प्रातः ५ पर्यंत अभिषेक व होमहवन ता.२७ रोजी गुरुवारी सकाळी ९ वा.श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव निमित्त ह.भ.प. शिव किर्तनकार कु.भाग्यश्रीताई मोहिते यांचे किर्तन होईल.सकाळी ११ पासून महाप्रसाद होणार आहे तरी या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन कोटेश्वर मंदिर संस्थान व कंठेश्वर ग्रामस्थांनी केले आहे.

You cannot copy content of this page